शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

टॉयलेटपेक्षाही जास्त अस्वच्छ असतात रोजच्या वापरातील या गोष्टी, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 9:46 AM

Health Tips : या गोष्टींबाबत आपण नेहमीच डोळेझाक करतो आणि कशाचाही विचार न करता या गोष्टींचा बिनधास्त वापर करतो. चला जाणून घेऊ आपल्या आजूबाजूच्या अस्वच्छ गोष्टी कोणत्या आहेत.

Health Tips : जर तुम्ही स्वच्छतेबाबत फारच जागरुक राहत असाल आणि सार्वजनिक शौचालये जास्त स्वच्छ नसतात, असा विचार करुन ते वापरणे टाळत असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या टॉयलेटपेक्षा घाणेरड्या असतात. या गोष्टींबाबत आपण नेहमीच डोळेझाक करतो आणि कशाचाही विचार न करता या गोष्टींचा बिनधास्त वापर करतो. चला जाणून घेऊ आपल्या आजूबाजूच्या अस्वच्छ गोष्टी कोणत्या आहेत.

एअरपोर्ट सिक्युरिटी ट्रे

यूनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघमच्या रिसर्चनुसार, एअरपोर्टवर वापरले जाणारे प्लास्टिक सिक्युरिटी ट्रे कोणत्याही पब्लिक टॉयलेटच्या तुलनेत अधिक अस्वच्छ असतात. या ट्रेच्या वापराने आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. रिसर्चमधून हे समोर आले आहे की, या ट्रेमध्ये  जास्त व्हायरस असतात, जे कुणालाही सर्दी-खोकला, निमोनिया आणि ब्लॅडर इन्फेक्शन करु शकतो. 

मोबाईल फोन

मोबाईल फोन हे टॉयलेट सीटपेक्षाही जास्त अस्वच्छ असतात. अभ्यासकांनी सूक्ष्म जीवांच्या तीन अशा प्रजाती शोधून काढल्या आहेत ज्या मोबाईल फोनवर राहतात आणि वाढतात. काही स्मार्टफोन्सवर तर असे बॅक्टेरिया आढळतात ज्यांच्यावर औषधांचा अजिबार परिणाम होत नाही. २०१५ मध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये मॉलिक्यूलर मायक्रोबायोलॉजी अॅन्ड इम्यूनॉलॉजी विभागाला एका अभ्यासात आढळलं की, टॉयलेटच्या सीटवर तीन प्रकारचे बॅक्टेरिया असतात. तर मोबाईल फोनवर साधारण १० ते १२ प्रकारचे वेगवेगळे फंगस आणि बॅक्टेरिया असतात. 

ऑफिसची टी बॅग चहा

ब्रिटीश संस्था इनिशल वॉशरुम हायजीनने आपल्या एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, टी बॅगच्या चहामध्ये टॉयलेट सीटच्या तुलनेत १७ टक्के जास्त बॅक्टेरिया असतात. जास्तीत जास्त ऑफिसेसमध्ये टी बॅग असलेला चहा दिला जातो. पण या रिपोर्टनुसार, एका टॉयलेट सीटवर २२० बॅक्टेरिया असतात तर ऑफिसमधील टी बॅगच्या चहामध्ये ३, ७८५ बॅक्टेरिया असतात.

किचनमध्ये वापरला जाणारा कपडा

एक्सपर्टनी इशारा दिला आहे की, किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या कपड्यामध्ये ई-कोलाइ बॅक्टेरिया आढळतो. याने फूड पॉयजनिंगचा धोका असतो. एका नव्या शोधानुसार, हे समोर आले आहे की, किचनमध्ये पुन्हा पुन्हा एकच कपडा वापरल्याने परिवारातील सदस्यांना फूड पॉयजनिंगचा धोका असतो. 

विमानातील सीट बेल्ट

विमानातील सीट बेल्टमध्ये जास्त बॅक्टेरिया असतात. दररोज कितीतरी लोक सीट बेल्ट बांधण्यासाठी आणि काढण्यासाठी त्याला हात लावतात. यामुळे किटाणू पसरतात. त्यामुळे सतत एक हॅन्ड सॅनिटायझर सोबत ठेवा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य