Health Tips : तशी फिट आणि निरोगी राहण्यासाठी सर्वांनीच थोडा वेळ एक्सरसाइज करायला हवी. तुम्ही कोणत्याही प्रकारची फिजिकल अॅक्टिविटी केली नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. पण ज्याप्रमाणे तुम्हाला माहीत असेलच की, कोणत्याही गोष्टीची अति केल्यास माती होते. तेच एक्सरसाइजबाबतही लागू पडतं. जास्त एक्सरसाइज करणं देखील आरोग्यासोबतच मेंदूसाठी नुकसानकारक ठरतं.
जास्त एक्सरसाइजने मेंदूवर वाईट प्रभाव
ajc.com ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रमाणापेक्षा जास्त एक्सरसाइज केल्याने आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडू शकतो. असा दावा आमचा नाही तर एका नव्या रिसर्चमधून करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जास्त एक्सरसाइज केल्याने मेंदूवर वाईट प्रभाव पडू शकतो. तज्ज्ञांचं मत आहे की, याचं कारण ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम आहे. ही समस्या जास्त एक्सरसाइज केल्याने होते.
३५ वयाच्या ३७ खेळाडूंवर रिसर्च
हा रिसर्च ३५ वयाच्या ३७ एथलिट्सवर करण्यात आला. या खेळाडूंना तीन आठवडे त्यांची एक्सरसाइज सुरूच ठेवणे आणि ४० टक्के वाढवण्यास सांगण्यात आले. यादरम्यान तज्ज्ञांनी या खेळाडूंना काही प्रश्न विचारले. शेवटी सर्वांचा एमआरआय स्कॅन केलं. या रिसर्चच्या निष्कर्षातून ही बाब समोर आली की, तीन आठवड्यांपेक्षा जास्त एक्सरसाइज करणाऱ्यांच्या व्यवहारात बदल झाला होता आणि त्यांना थकवाही जास्त जाणवला होता.
विचारांच्या प्रक्रियांमध्ये बदल
तज्ज्ञांचं मत आहे की, अशा व्यक्तींची निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होते आणि ते अनेकदा योग्य ते निर्णय घेऊ शकत नाहीत. आपल्या जीवनाच्या लक्ष्याबाबत त्यांच्यातील व्यवहार आणि विचार प्रकियांमध्ये बदल दिसू शकतो. त्यामुळे एक्सरसाइज करणे गरजेची आहे. पण अति करू नये.