Turmeric Tea Benefits : वजन वाढणे ही अलिकडे अनेकांसाठी मोठी गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात. अशात ती ओळखून जर योग्य उपाय केले तर वजन कमी होण्यास लगेच मदत मिळेल. असाच एक घरगुती उपाय म्हणजे टर्मरिक टी (हळदीचा चहा). हळदीमध्ये अॅंटीसेप्टिक आणि अॅंटी-बायोटिक्ससोबतच वोलेटाइल ऑईल, पोटॅशिअम, ओमेगो -३ फॅची अॅसिड, लायनोलेनिक अॅसिड, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट तसेच फायबर असतात.
केवळ एक मसाला म्हणूनच नाही तर हळद आरोग्य चांगलं ठेवण्याच्या कामासाठीही वापरलं जातं. एका नव्या शोधानुसार हे समोर आलं आहे की, हळदीच्या मदतीने बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी होते. जर तुम्ही रोज दोन कप हळदीचा चहाचा तुमच्या रुटीनमध्ये समावेश केला तर याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
हळदीच्या चहाचे फायदे
ब्लड शुगरला रेग्युलेट करण्यासोबत टर्मरिक टी पचनक्रियेसाठीही फायदेशीर आहे. आणि जेव्हा पचनक्रिया चांगली होते तेव्हा वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने काम करु लागते. हळदीमध्ये अॅंटी इनफ्लेमेटरी तत्व असतं आणि हे तत्व फॅट सेलची वाढ होऊ देत नाही.
कसा कराल हा खास चहा?
हळद आणि आले : एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात चिमुटभर हळद आणि एक छोटा तुकडा आले टाका. चहा चांगला उकळू द्या, त्यानंतर चहा गाळून थोडा कोमट झाल्यावर सेवन करा. आले भूक कमी करतं आणि हळद मेटाबॉलिज्म रेट वाढतं.
हळद आणि मिंट : जर तुम्हाला मिंट फ्लेवर पसंत असेल तर तुम्ही हळदीचा चहा मिंटसोबतही तयार करु शकता. मेंथॉलने फ्रेशनेस आणि पचनक्रिया चांगली राहते. तसेच याने फॅट इंजाइम्स एनर्जीमध्ये रुपांतरित होतील.
दालचीनी सोबत हळदीचा चहा : दालचीनी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते आणि हे तुम्ही हळदीच्या चहात मिश्रण करुन सेवन कराल तर याचा फायदा अधिक जास्त बघायला मिळतो. याने इन्सुलीन सेन्सिटीव्हिटी सुधारते आणि यात अॅंटी-ऑक्सिडेंटही भरपूर प्रमाणात असतात.
हळद आणि मध : हळदीसोबत तुम्हाला जर गोड चव हवी असे तर मधापेक्षा चांगला पर्याय नाही. वजन कमी करण्यासाठी मध फार फायदेशीर आहे. मधाने भूक कमी होते आणि वजन कमी करण्यास मदतही होते.
(टिप : हा उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या, कारण यातील काही गोष्टींची काही लोकांना अॅलर्जी असू शकते. अशावेळी त्याचा विपरीत परीणाम होऊ नये म्हणून सल्ला घ्या.)