Paracetamol Risk: कोरोना महामारी दरम्यान पॅरासिटामोलचा वापर वेगाने वाढला. आता एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, याचं जास्त सेवन केल्याने जीवाला धोका होऊ शकतो. याच्या रोजच्या वापराने ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. रिसर्चमध्ये सहभागी एक्सपर्ट्सने इशारा दिला आहे की, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका असणाऱ्या लोकांनी पॅरासिटामोल घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पॅरासिटामोलवर करण्यात आलेला हा रिसर्च एडिनबर्ग यूनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट्सनी हाय ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांवर केला. रिसर्चमध्ये हाय ब्लड प्रेशरची हिस्ट्री असलेल्या ११० रूग्णांना सहभागी करून घेण्यात आले होते.
कसा केला रिसर्च?
रूग्णांना दोन आठवड्यांपर्यंत पॅरासिटामोलची गोळी दिवसातून चार वेळा देण्यात आली. चार दिवसांनी जेव्हा चेकअप करण्यात आलं तेव्हा या रूग्णांमध्ये ब्लड प्रेशर बरच वाढलेलं होतं. ब्लड प्रेशर झाल्याने रूग्णांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता २० टक्के वाढली होती.
ब्रिटनमध्ये पॅरासिटामोलची विक्री जास्त
हा रिसर्च ब्रिटनमधील लोकांवर करण्यात आला. ब्रिटनमध्ये जवळपास १० पैकी एक व्यक्ती जुन्या दुखण्यासाठी पॅरासिटामोलचं सेवन करतात. लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे ब्रिटनमध्ये जवळपास तीन वयस्क लोकांपैकी एक वयस्क व्यक्ती हाय ब्लड प्रेशरने पीडित आहे.
या रूग्णांनी पॅरासिटामोलपासून दूर रहावं
एडिनबर्ग यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डेविड वेब यांनी सांगितलं की, आतापर्यंत पॅरासिटामोलला एक सुरक्षित औषध म्हणून पाहिलं जात होतं. पण या रिसर्चनंतर आम्ही हेच म्हणू की, हार्ट अटॅकचा धोका असणाऱ्या रूग्णांनी पॅरासिटामोलपासून दूरच रहावं. त्यांनी डॉक्टरांना सूचना केली की, त्यांनी पॅरासिटामोलची खुराक तेवढीच द्यावी जेवढी आवश्यक आहे.
पॅरासिटामोलचा वापर कधी कधी चांगला
एनएचएस लोथियनमध्ये क्लीनिकल फार्मालॉजी आणि नेफ्रोलॉजीमध्ये सल्लागार मुख्य डॉ. इयान मॅकइंटायर म्हणाले की, 'डोकेदुखी किंवा तापासाठी पॅरासिटामोलचं सेवन कधी कधी ठीक आहे. पण जे लोक सामान्यपणे जुन्या दुखण्यासाठी याचा बऱ्याच काळापासून नियमित वापर करत असतील तर त्यांच्यासाठी धोका जास्त आहे'.
एक्सपर्ट म्हणाले की, रिसर्चमधून आढळून आलं की, जेव्हा रिसर्चमध्ये सहभागी लोकांनी पॅरासिटामोल घेणं बंद केलं, त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल झालं. त्यामुळे हे महत्वपूर्ण आहे की, डॉक्टर नियमितपणे पॅरासिटामोल घेणाऱ्या रूग्णांना याच्या धोक्याबाबतही सांगावं.