शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

किडनीवर कोणत्या कारणांनी येते सूज? जाणून घ्या कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 12:46 PM

Swollen on kidney : किडनीवर सूज येण्याला मेडिकल भाषेत 'ग्लोमेरुलोनेफ्रायटिस' असं म्हटलं जातं. किडनीवर सूज आल्याने किडनीच्या फिल्टरवर सूज येते. किडनीचं फिल्टर हे फार छोच्या छोच्या रक्तवाहिन्यांपासून तयार झालेलं असतं

Swollen on kidney : मनुष्याच्या शरीरात दोन किडनी असतात. एक डावीकडे आणि एक उजवीकडे. किडनीची प्रमुख कार्ये शरीरात निर्माण होणाऱ्या अनावश्यक विषारी पदार्थांना मूत्राशयाद्वारे बाहेर टाकणे, शरीरासाठी आवश्यक पाण्याची मात्र कायम ठेवणे, अधिक जमा झालेले पाणी मूत्राद्वारे बाहेर काढून टाकणे, तसेच किडनी शरीरात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फ रस, बायकार्बोनेट वगैरेचे प्रमाण यथायोग्य ठेवण्याचे कार्य करते. पण काही वेगवेगळ्या कारणांमुळे किडनीवर सूज येते. 

किडनीवर सूज येण्याला मेडिकल भाषेत 'ग्लोमेरुलोनेफ्रायटिस' असं म्हटलं जातं. किडनीवर सूज आल्याने किडनीच्या फिल्टरवर सूज येते. किडनीचं फिल्टर हे फार छोच्या छोच्या रक्तवाहिन्यांपासून तयार झालेलं असतं, याला ग्लोमेरुली असं म्हटलं जातं. 

जेव्हा ही सूज अचानक येते आणि वाढत जाते तेव्हा समस्या गंभीर होऊ शकते. त्यामुळे किडनीवर आलेल्या सूजेवर दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. पण किडनीवर सूज आल्याची लक्षणे तुमच्या वेळीच लक्षात यायला हवी. जेणेकरुन त्यावर वेळीच उपाय करता यावे. 

किडनीवर सूज आल्याची लक्षणे

किडनीवर सूज आल्याची लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. सतत ताप येणे, लघवी करताना वेदना होणे, लाल रंगाची लघवी येणे, असह्य वेदना होणे, कमी लघवी येणे, जास्त थकवा जाणवणे, श्वासाची दुर्गंधी येणे ही प्रमुख लक्षणे आहेत. 

किडनीवर सूज आल्याने काय होतं?

किडनीवर सूज किंवा नेफ्रायटिस एक अशी स्थिती आहे ज्यात किडनीच्या मुख्य भागावर सूज येते. याला नेफ्रोन म्हटलं जातं. याने शरीरातील रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होते. 

का येते किडनीवर सूज?

संक्रमणामुळे

घशात खवखव होणे किंवा त्वचेवर कोणत्या प्रकारचं संक्रमण झालं आणि त्यावर वेळीच उपचार न घेतल्याने किडनीवर सूज येते. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये संक्रमण ठीक होतं आणि किडनीमध्येही सुधारणा होते. पण किडनीच्या वेगवेगळ्या समस्यांचा प्रभाव ग्लोमेरुलसवर पडतो. जसे की, लघवी करताना त्रास होणे आणि किडनीची रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होणे. 

मधुमेह ग्रस्तांना असतो धोका

मधुमेह, ल्यूपस आणि एएनसीए वस्कुल्टिससारख्या काही ऑटो इम्यून आजारांनी ग्रस्त लोकांना सेकंडरी ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे किडनीवर सूज येणे ही समस्या होऊ शकते. अशावेळी वेळीच उपचार केले गेले तर किडनी वाचवली जाऊ शकते. 

अॅंटी-बायोटिक औषधांमुळे

अनेकजण वेगवेगळ्या त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी एंटीबायोटिक औषधांचं सेवन करतात. पण याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणं महागात पडू शकतं. या औषधांच्या अधिक सेवनामुळे किडनीवर सूज येण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे ही औषधे घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. अशात लघवीतून रक्त येत असल्याचे किंवा लाल लघवी होत असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांना भेटा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य