Breakfast Tips : दिवसाची सुरूवात चांगली करायची असेल तर नाश्ता फार महत्वाचा ठरतो. तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा आरोग्य चांगलं ठेवायचं असेल किंवा दिवसभर एनर्जी हवी असेल तर तुमचा नाश्ता फार महत्वाचा ठरतो. तुमचा नाश्ता चुकीचा असेल तर तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.
जास्तीत जास्त लोकांचं असं मत असतं की, नाश्त्यात कॅलरी कमी असतात आणि यात जास्त फॅट नसतं. पण नाश्ता हेल्दी आहे की नाही हे मोजण्याची वेगवेगळी पद्धत आहे. चला जाणून घेऊ की हेल्दी नाश्ता काय आहे आणि त्याने तुम्ही केस फिट रहाल.
हेल्दी ब्रेकफास्ट काय असतो?
सकाळच्या नाश्त्यामध्ये कॅलरी फार कमी असण्याची गरज नसते. वास्तविक पाहता तुमचा नाश्ता तुमच्या दुपारच्या जेवणापेक्षा अधिक पोट भरणारा असला पाहिजे आणि डिनरच्या तुलनेत अधिक कॅलरी असलेला असावा. नाश्त्यात फॅटचं प्रमाण कमी असलं पाहिजे. पण याचा अर्थ हा नाही की, फॅट अजिबातच असू नये.
दुपारच्या जेवणापर्यंत हेल्दी नाश्त्याने तुमचं पोट भरलेलं असलेलं पाहिजे. केवळ चहा आणि बिस्कीटांऐवजी आणखीही काही हेवी पदार्थ खाल्ले पाहिजेत. भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त नाश्ता तुमचं वजन कमी करण्यात अडचण निर्माण करू शकतं. एक हलका नाश्ता लगेच पचेल आणि ब्लड शुगर लेव्हल कमी होईल.
मुळात हेल्दी नाश्ता तुम्हाला दिवसाची दमदार सुरूवात करण्यासाठी ऊर्जा देणारा असला पाहिजे. जे लोक हेवी आणि हेल्दी नाश्ता करून कामावर जातात ते काम करताना एनर्जेटिक राहतात.
कडधान्य असावेत
कोणतेही न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला नाशत्यात कार्ब आणि अनेक कडधान्यांचं सेवन करण्याचा सल्ला देतात. कॉम्प्लेक्स कार्बमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि ब्लड शुगरचं प्रमाण योग्य ठेवण्यास मदत मिळते.
पर्याय म्हणून तुम्ही नाश्त्यात दलिया किंवा ओट्सचा समावेश करू शकता. भरपूर कार्ब्स घेतल्याने तुम्हाला सतत भूक लागत नाही आणि सोबतच जास्त वेळ एनर्जी मिळते. नाश्त्यात ब्रेड, बिस्कीट आणि पावसहीत सर्वच प्रोसेस्ड किंवा रिफाइंड धान्य खाणं टाळलं पाहिजे.
फळं महत्वाची
नाश्त्यातमध्ये हेल्दी पदार्थांसोबत काही फळांचाही समावेश करावा. कारण यातून तुम्हाला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅंटी-ऑक्सिडेंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स इत्यादी गोष्टी मिळतात. याने तुमची इम्यूनिटी मजबूत राहते. फळांमध्ये असलेली नैसर्गिक शुगर तुम्हाला एनर्जी देण्यासाठी मदत करते. ज्याने सकाळी तुम्हाला धावपळ करण्यासही एनर्जी मिळते. नाश्त्यात केळी, सफरचंद, पपई, द्राक्ष, डाळिंब इत्यादी फळांचा समावेश करावा.
नाश्त्यात दूध
काही लोक असा विचार करतात की, दूध गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेला पारंपारिक नाश्ता आहे आणि हा फार गरजेचा नाही. पण हा चुकीचा विचार आहे. कारण दुधातून तुम्हाला अनेक प्रकारचे डायट्री मिनरल्स मिळतात. त्यामुळे दुधाचा नाश्त्यात समावेश करावा.