Breakfast Tips : सकाळी नाश्ता करणं चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. दिवसभराच्या एनर्जीसाठी आणि ऊर्जेसाठी पोटभर नाश्ता आवश्यक असतो. त्यामुळेच डॉक्टर रोज सकाळी नाश्ता करण्याचा सल्ला देतात. हा नाश्ता आणखी आरोग्यदायी तेव्हा होईल जेव्हा तुम्ही योग्य पदार्थांचा नाश्त्यात समावेश कराल. नाश्ता म्हणून खाल्लेले काही पदार्थ हे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. चला जाणून घेऊया नाश्त्यात काय असू नये...
1) वजन कमी करायचं असेल तर खाऊ नका इडली-ढोकळा
दक्षिण भारतासह देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये इडली सांभर नाश्त्याला आवडीने खातात. सोबतच ढोकळाही खाल्ला जातो. हा नाश्ता चांगलाच हेल्दी मानला जातो. पण सतत हा नाश्ता केल्याने वजन वाढण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे रोज हेच पदार्थ नाश्त्यात खाऊ नये.
2) असे खा अंडे आणि दही
सकाळी नाश्त्यात मसालेदार मांस खाण्यापेक्षा अंडे खाणे अधिक फायद्याचे ठरते. कारण अंड्यात सोडियमचं प्रमाण कमी असतं. नाश्त्यात दही खाणेही फायदेशीर आहे. पण ते दही मलाईच्या दूधापासून तयार केलेलं नसावं.
3) कॉफी
सकाळी सकाळी नाश्ता करताना कॉफी प्यायल्यास भूक कमी होते. कोल्ड कॉफीही हॉट कॉफीपेक्षा जास्त नुकसानदायक आहे. कारण यात शूगर आणि क्रीम जास्त असतं. यामुळे कॅलरीज अधिक वाढण्याची शक्यता असते.
4) बर्गर खाणे टाळा
अलिकडे अनेक विदेशी कंपन्यांच्या बर्गरचा नाश्ता केला जातो. बर्गर परदेशात मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. पण या नाश्त्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणात वजन वाढण्याची समस्या भेडसावत आहे. हीच समस्या तुम्हालाही होऊ शकते.
5) नाश्त्याला फ्रिजमध्ये ठेवलेलं खाऊ नका
अनेकदा काही लोक सकाळचा नाश्ताही तयार करुन फ्रिजमध्ये ठेवतात आणि सकाळी उठून खातात. पण असे करणे आपल्या शरीरासाठी नुकसानदायक आहे. इतकेच काय तर फ्रिजमध्ये ठेवलेली फळेही खाण्याआधी 1 तासांपूर्वी बाहेत काढून ठेवावीत.