शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

पायांद्वारे आरोग्याबाबत मिळतात हे इशारे, 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 10:24 AM

Health Tips : तळपायात होणारे बदल अनेक प्रकारच्या आजारांकडे आणि हृदयाचं आरोग्या ठिक नसण्याकडेही इशारा करतात.

Health Tips :  पायांद्वारे व्यक्तीच्या कितीतरी सवयींची माहिती मिळवली जाऊ शकते. इतकेच नाही तर पायांवरून व्यक्तीचं आरोग्य कसं आहे याबाबतही सांगता येऊ शकतं. अनेकांच्या तळपायांवर असे काही निशाण दिसतात जे एखाद्या गंभीर आजाराकडे इशारा करतात. पायांच्या बोटावरील नखांचा रंग बदलणे आणि पाय कधी कधी सून्न होणे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. असे मानले जाते की, तळपायात होणारे बदल अनेक प्रकारच्या आजारांकडे आणि हृदयाचं आरोग्या ठिक नसण्याकडेही इशारा करतात. याचीच काही लक्षणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पाय थंड होणे

काही लोकांना ही समस्या सामान्य वातावरणातही होते. सामान्यपणे ही समस्या पायांमध्ये व्यवस्थित ब्लड सर्कुलेशन होत नसल्याने होते. ही समस्या तुम्ही व्यायाम आणि योगाच्या माध्यमातून दूर करू शकता. याच्या इतर कारणांमध्ये एनीमिया, सतत थकवा, तंत्रिका तंत्र ठिक नसणे, मधुमेह, हायपोथायरायडिज्म आणि हायपोथर्मियासारख्या आजारांचाही समावेश होऊ शकतो. 

पायांच्या जॉइंट्समध्ये वेदना

याचा अर्थ तुम्ही रूमेटॉइड अर्थारायटिसने पीडित आहात. पण ही समस्या वयोवृद्धांमध्ये अधिक असते. या स्थितीत अचानक वेदना होणे आणि काही तासांनंतर आराम मिळू शकतो. सुरूवातीला तुम्ही यासाठी वेदना दूर करणारं सामान्य औषध घेऊ शकता, पण समस्या जास्तच असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

पायाच्या बोटांचे केस गळणे

या स्थितीत तुमचं हृदय रक्त योग्यप्रकारे पंप करत नसतं. त्यामुळे पायांच्या बोटांपर्यंत रक्ताच्या माध्यमातून झिंक इत्यादी पोहोचू शकत नाही. झिंकच्या कमतरतेमुळे पाय आणि पायांच्या बोटांवरील केस गळू लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी भरपूर भाज्यांचं सेवन करा.

नखांचा रंग बदलणे

पायाच्या बोटांच्या नखांचा रंग बदलण्याचा अर्थ आहे की, नखांमध्ये एखादं फंगल इन्फेक्शन झालंय. काही स्थितीत हे त्वचा रोगाचं लक्षणही असतं. अशात पाय डेटॉलने स्वच्छ धुवावे. त्यानंतर त्यावर मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाका. लवकरच ही समस्या दूर होऊ शकते.

पायांवर सूज

सामान्यपणे फार जास्त पायी चालल्याने ही समस्या होते. दुसरीकडे ही समस्या फायलेरिया रोगाचही लक्षण असू शकतं. या स्थितीत जास्त वेळ न घालवता वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

जखम लवकर न भरणे

पायाला झालेली जखम फार जास्त दिवस झाल्यावरही बरी होत नसेल तर हे डायबिटीसचं लक्षण असू शकतं. वेळीच याबाबत डॉक्टरांशी चर्चा करा आणि योग्य ते उपचार करा.

नख काळं होणं

काही लोकांच्या पायांचे नख पूर्णपणे काळं होतं. हे फंगल टोनेल इन्फेक्शनमुळे होतं. हे लक्षण स्कीन कॅन्सरला जन्म देऊ शकतं. त्यामुळे याकडे सामान्य बाब समजून दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टाचांना भेगा

काही लोकांच्या टाचांना फार जास्त भेगा असतात आणि त्यात कधी कधी जखमाही असतात. इतकेच नाही तर कधी कधी यातून रक्तही येतं. या स्थितीला हायपरकेरायटोसिस म्हटलं जातं. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नखांवर लाल रेषा

नखांवर लाल रंगाच्या रेषा दिसत असता. याचा अर्थ असा होतो की, हे हृदयाशी संबंधित एखादं संक्रमण आहे. या स्थितीत रक्ताच्या काही धमण्या तुटतात. याबाबत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य