Health : 'फिट बॉडी’साठी तुरटीचा असा करा वापर !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2017 10:23 AM
आपली बॉडीदेखील फिट असावी असे प्रत्येकजणाला वाटते. त्यासाठी कित्येकजण जीम जाणे, व्यायाम करणे आदी विविध प्रयोग करताना दिसतात. मात्र घरातील तुरटीच्या वापराने आपण फिट होऊ शकता.
आपली बॉडीदेखील फिट असावी असे प्रत्येकजणाला वाटते. त्यासाठी कित्येकजण जीम जाणे, व्यायाम करणे आदी विविध प्रयोग करताना दिसतात. मात्रतुरटीच्या वापराने आपण फिट होऊ शकता. आपले वजन कमी करण्यासाठी आपल्याला महागडे प्रोडक्ट्स खरेदी करण्याची गरज नाही. तुरटीच्या योग्य वापराने आपण वजन सहज कमी करू शकता. * साहित्यतुरटी २ चमच, विक्स २ चमच, बेकिंग सोडा १ चमच आणि प्लास्टिक टेप* वापरण्याची पद्धत सुरुवातीला तुरटीचा मिक्सरच्या साह्याने बारीक चूरा करुन घ्या. त्यानंतर तुरटीच्या या पावडरमध्ये बेकिंग सोडा आणि विक्स टाकून पूर्णत: एकत्र करा. तयार झालेल्या या पेस्टला आता आपल्या पायांना, हातांना आणि पोटाला लावा. ज्या भागाची चरबी आपणाला कमी करायची आहे त्याठिकाणी या पेस्टला लावा. ज्या भागाला पेस्ट लावली आहे त्या भागावर प्लास्टिक टेप चांगल्या पद्धतीने बांधा. ही पेस्ट किमान दोन तास राहू द्या. असे आपल्याला किमान एका आठवड्यापर्यंत करायचे आहे. असे केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी नष्ट होते. विशेष म्हणजे तुरटीचा उपयोग आपण चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी करण्यासाठीदेखील करू शकतो. यासाठी तुरटीच्या तुकड्याला पाण्यात बुडवून हलक्या हाताने चेहऱ्याला लावा. कोरडे झाल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.Also Read : Health Tips : ...तर हे आहे टायगर श्रॉफचे फिटनेस रहस्य ! : FITNESS MANTRA : ...तर हे आहे बाहुबलीच्या फिटनेसचे रहस्य, जाणून घ्या डायट प्लॅन !