HEALTH : पावसाळ्यात संक्रमणापासून बचावासाठी करा ‘या’ विटॅमिनचा वापर !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 6:56 AM
याच्या सेवनाने शरीरात संक्रमित पेशी नष्ट होण्यास मदत होते आणि आजार लवकर दूर होतो.
पावसाळ्यात संक्रमणामुळे बऱ्याच आजारांचा धोका वाढलेला असतो. संक्रमणाने आजारी पडून शुटिंग बंद पडू नये म्हणून सेलिब्रिटी या दिवसात विशेष काळजी घेत असतात. त्यासाठी या दिवसात संक्रमणापासून बचाव होऊन रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सेलेब्सच्या आहारात विटॅमिन ‘सी’चा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यात विटॅमिन ‘सी’ चा मोठा स्त्रोत असणारे लिंबू, संत्री आदींचे सेवन जास्त प्रमाणात करतात. या पदार्थांच्या सेवनाने शरीरात संक्रमित पेशी नष्ट होण्यास मदत होते आणि आजार लवकर दूर होतो. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विटॅमिन ‘सी’ खूपच उपयुक्त मानले जाते. विशेषत: लिंबूमध्ये विटॅमिन ‘सी’ मोठ्या प्रमाणात असते, यासाठी लिंबू पाणीचे सेवन करूनही संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो. एका संशोधनानुसार, विटॅमिन ‘सी’ मुळे मायक्रोबॅक्टेरियम स्मेगमेटिस नष्ट होतो, जो एक गैर-रोगजनक जीवाणू आहे. तज्ज्ञांच्या मते, रोज कमीत कमी ५०० मिलीग्रॅम विटॅमिन ‘सी’चे सेवन आवश्यक आहे. कारण यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून कॉमन कोल्ड फ्लू, संक्रमणाचे गांभीर्य आणि त्याचा कालावधी कमी होतो. मात्र विटॅमिन ‘सी’चे प्रमाण १ हजार मिलीगॅ्रम पेक्षा जास्त नसावे, ते शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. * कच्चे दूध सेवन केल्यानेही होते संक्रमण डॉक्टरांच्या मते, प्राण्यांमध्ये ब्रूसेलॉसिस संक्रमणाचा एक अन्य प्रकार आहे, ज्यामुळे मनुष्यदेखील प्रभावित होऊ शकतात. पावसाळ्यात अशा प्राण्यांचे विना पाश्चयुरीकृत (कच्चे) दुधाचे सेवन केल्यास या संक्रमणाचा धोका वाढू शकतो. * जाणून घेऊया कोणत्या पदार्थात विटॅमिन ‘सी’चे किती प्रमाण आहेलिंबूवर्गीय फळ (लिंबू, संत्री) -५३.२ मिलीग्रॅमहिरवा भाजीपाला- १२० मिलीग्रॅमशिमला मिरची - १८३.५ मिलीग्रॅमपेरू- २२८.३ मिलीग्रॅमब्रॉकली - ८९.२ मिलीग्रॅमस्ट्रॉबेरी - ५८.८ मिलीग्रॅमकिवी - ९२.७ मिलीग्रॅमटोमॅटो - २२.८ मिलीग्रॅममटार - ६० मिलीग्रॅमपपई - ६०.९ मिलीग्रॅम(प्रमाण : प्रति १०० ग्राम वर आधारित) Also Read : Fitness : फिटनेससाठी सेलिब्रिटी सेवन करतात ‘हे’ विटॅमिनयुक्त पदार्थ ! : विटॅमिन ‘डी’चा अभाव ! आजाराला आमंत्रण !!