Health : काय आहे ‘आॅटोइम्यून डिसआॅर्डर’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2017 12:57 PM
सलमान खानच्या हिरोईनला झालेल्या या आजाराबाबत अधिक जाणून घेऊया
आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती आपल्याला आजारांपासून आणि संक्रमणापासून वाचविते. जर आपणास स्वप्रतिरक्षित रोग म्हणजेच आॅटोइम्यून डिसआॅर्डरने पिडीत असाल तर आपली रोगप्रतिकार शक्ती चुकून आपल्या स्वस्थ पेशींवर आक्रमण करु लागते. यामुळे शरीराचे कित्येक भाग प्रभावित होतात. अजूनही या रोगोचे खरे कारण स्पष्ट झाले नाही. हा आजार अनुवांशिक असू शकतो, असे काही तज्ज्ञांनी जाहीर केले आहे. विशेषत: अफ्रिकी-अमेरिकी, हिस्पॅनिक-अमेरिकी आणि मुळ अमेरिकी महिलांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. स्वप्रतिरक्षित रोगाचे ८० पेक्षा जास्त प्रकार आहेत आणि यापैकी काहींचे लक्षणे सारखे आहेत. ज्याकारणाने चिकित्सा करण्यासाठी तज्ज्ञांना कठीण होते. आपल्याला हा रोग आहे की, नाही आणि आहे तर कोणत्या प्रकारचा आहे, हे समजूच शकत नाही. शिवाय याचे निदान करणे खूपच कठीण आणि त्रासदायक आहे. या आजाराचे सुरुवातीचे लक्षणे थकवा, मांसपेशीमध्ये दुखणे आणि हलका ताप असे आहेत. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे दाह आहे, ज्याकारणाने लाली, जळजळ, दुखणे आणि सूज येऊ शकते.Also Read : ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त होती सलमान खानची हिरोईन स्नेहा उल्लाल!