हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्ट आज माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात गंभीर समस्या बनली आहे. जास्तीत जास्त प्रकरणात हार्ट अटॅक अचानक येतात. तुम्हाला माहीत आहे का जास्तीत जास्त हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट सकाळच्यावेळी बाथरूमध्ये येतात. तुम्हाला वाटत असेल तर असं का होतं? बाथरूमध्ये हार्ट अटॅक येण्याची अनेक कारणं आहेत. जर तुम्हाला या कारणांबाबत माहिती असेल तर स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊ शकता.
हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?
विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास लक्षात येईल की, हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट यांचा थेट संबंध आहे. रक्ताच्या माध्यमांतून शरीराला ऑक्सिजन आणि गरजेचे पोषक तत्व पोहोचत असतात. जेव्हा हदयाच्या मासपेशींमुळे धमन्यांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यावेळी हृदयाचे ठोके असंतुलित होतात. यात हार्ट अटॅक किंवा कार्डिएक अरेस्टचा धोका असतो.
बाथरूमध्ये हार्ट अटॅक येण्याचं पहिलं कारण
सकाळच्यावेळी जेव्हा तुम्ही टॉयलेटमध्ये जाता तेव्हा पोट पूर्ण साफ करण्यासाठी आपल्याला प्रेशरची आवश्यकता असते. इंडियन टॉयलेटच्या वापर करताना अनेकांना अधिक प्रेशरची आवश्यकता भासते. यामुळे आपल्या हृदयाच्या पेशींवर अधिक तीव्रतेने दबाव पडत असतो. यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.
बाथरूमध्ये हार्ट अटॅक येण्याचे दुसरं कारण
तुम्ही पाहिलं असेल बाथरूमचं तापमान घरातील इतर खोल्यांच्या तुलनेत जास्त थंड असते. अशा स्थितीत शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित ठेवण्यासाठी अधिक कार्य करावे लागते. यामुळे हृदयरोगाचा धोका उद्भवू शकतो.
तिसरे कारण
सकाळच्यावेळी आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर तुलनेने जास्त असते. अंघोळ करण्यासाठी अधिक ठंड किंवा गरम पाणी डोक्यावर टाकलं जातं. त्यामुळे ब्लड प्रेशरवर परिणाम झाल्यानं हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढू शकतो.
बचावाचे उपाय
जर तुम्ही भारतीयशैलीच्या स्वच्छतागृहाचा वापर करत असाल तर जास्तवेळ एकाच स्थितीत बसणं टाळा. या पद्धतीने तुम्ही हार्ट अटॅक किंवा कार्डीयाक अरेस्टपासून स्वतःचा बचाव करू शकता.
दुर्लक्ष नको! आता वेगळ्या क्रमाने दिसू लागली कोरोनाची लक्षणे, आधी येतो ताप मग सुरू होते अंगदुखी....
अंघोळ करताना पाण्याच्या तापमानाचा अंदाज घेऊन सगळ्यात आधी पायाच्या तळव्यावर पाणी टाका. त्यानंतर हलकं गरम पाणी आपल्या डोक्यावर टाका. यामुळे तुम्हाला आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. पोट साफ होण्यासाठी जास्त जोर लावू नका किंवा घाईसुद्धा करू नका.
झोपेतून उठताच 'ही' समस्या जाणवत असेल तर वेळीच व्हा सावध, असू शकतो डायबिटीसचा इशारा....
जर अंघोळ करताना तुम्ही जास्तीत जास्तवेळ बाथटबमध्ये बसून राहत असाल तर याचा परिणाम तुमच्या धमन्यांवर होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्तवेळ बाथटबमध्ये बसून राहणं टाळा.
लक्षणं
छातीत तीव्रतेनं वेदना होणं
श्वास घेण्यासाठी त्रास होणं
थकवा येणं
ताण-तणाव
भीती वाटणं
चक्कर येणं
उलटी येणं.
डायबिटीसच्या रुग्णांमध्ये अनेकदा कोणतीही लक्षणं दिसत नसताना हार्ट अटॅकचा धोका उद्भवतो. त्यामुळे या आजाराला सायलेंट किलर असंही म्हणतात.
हार्ट अटॅक आल्यानंतर काय करायचं?
जर कोणत्याही व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर सगळ्यात आधी त्याला जमिनीवर झोपण्यास सांगा.
व्यक्तीने घट्ट कपडे घातले असतील तर सैल करण्याचा प्रयत्न करा.
झोपताना व्यक्तीचे डोके वरच्याबाजूने असेल याची काळजी घ्या.
त्वरीत रुग्णवाहिकेला फोन करा.
हात पायांना तेल लावा.