Health : कच्चे केळ खाण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2017 8:46 AM
कच्च्या केळीचा वापर आपण फक्त भाजी आणि कोप्ता बनविण्यासाठीच करतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कच्च्या केळीचे फायदे आपणास माहितच नाहीत.
-Ravindra Moreपिकलेले केळं खाण्याचे फायदे आपल्याला माहितच आहेत. त्यानुसार आपण नियमित पिकलेल्या केळीचे सेवनदेखील करीत असाल. किंवा बनाना शेक आणि स्मूदी बनवून घेत असाल. पिकलेल्या केळीचे आपण अनेक पद्धतीने सेवन करु शकतो, मात्र कच्च्या केळीचा वापर आपण फक्त भाजी आणि कोप्ता बनविण्यासाठीच करतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कच्च्या केळीचे फायदे आपणास माहितच नाहीत. कच्च्या केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे इम्यून सिस्टम मजबूत बनते सोबत दिवसभर शरीराला अॅक्टिवदेखील ठेवते. यातील ‘विटॅमिन बी६’, ‘विटॅमिन सी’ पेशींना पोषकत्त्व देण्यास मदत करतात. शिवाय यात सुदृढ स्टार्च असतो आणि सोबतच अॅन्टि- आॅक्सिडेंट्सदेखील. यासाठी नियमित एक कच्चे केळ खाल्लयाने फायदेशीर आहे. * कच्चे केळ खाण्याचे फायदे* पचनक्रिया सुधारण्यास मदत कच्च्या केळीच्या सेवनाने पाचक रसांचे स्त्रावण उत्तम प्रकारे होत असल्याने पचनक्रिया सुदृढ होण्यास मदत होते. * वजन घटण्यास मदत जे वजन घटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांनी रोज एक कच्च्या केळीचे सेवन करावे. यात भरपूर प्रमाणात फायबर्स असल्याने शरीरातील अनावश्यक फॅट सेल्स आणि अशुद्धतेला नष्ट करण्यास मदत होते. * मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदतआपणास मधुमेहाची समस्या असेल आणि प्राथमिक स्तर असेल तर आतापासून कच्च्या केळीचे सेवन करायला सुरुवात करा. हा डायबिटीज कंट्रोल करण्याचा उत्तम पर्याय आहे. * मलावरोधच्या समस्येपासून मुक्तताकच्च्या केळीतील फायबर आणि हेल्दी स्टार्चमुळे आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा मल साचून राहत नाही. अशातच आपल्याला मलावरोधची समस्या असल्यास कच्च्या केळीच्या सेवनाने या समस्येपासून मुक्त व्हाल. * भूकला शांत करण्यास मदतकच्च्या केळीच्या सेवनाने त्यातील फायबर्स आणि अन्य पोषक तत्त्वांमुळे भूक नियंत्रित होण्यास मदत होते. कच्चे केळ खाल्लयाने वेळोवेळी भूक लागत नाही आणि जंक फूट तसेच अन्य अनहेल्दी वस्तू खाण्यापासून परावृत्त होतो. * याशिवाय कच्च्या केळीच्या सेवनाने कित्येक प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते. यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात, सोबतच मूड स्विंगच्या समस्येतदेखील फायदा होतो.Also Read : लाल केळी आरोग्यासाठी फायदेशीर ! : वजन कमी करण्यासाठी केळी खाSource : Aajtak