भारतात कोरोना लसीकरणाच्या अभियानाला सुरूवात झाली आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९ लाख ९९ हजार ६५ लोकांचे लसीकरण झाले आहे. गुरूवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास ९२ हजार ५८१ लोकांना लस देण्यात आली होती. यादरम्यान देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेटसुद्धा ९६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन कोटी ६५ हजारांपेक्षा अधिक लोक कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. अशा स्थितीत भारतात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानात कार्यरत असलेल्या डॉ. तनुजा नेसारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी अंघोळ केल्यानंतर लगेचच तुळशीला एक परिक्रमा मारण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे यामागे काही वैज्ञानिकही कारण आहेत. तुळशीचं झाड लावल्यानं चारही बाजूंचे वातावरण शुद्ध आणि चांगले राहते. हवा शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.
तुळशीत अनेक एंटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीरारीतील फ्री रेडिकल्स नष्ट होण्यास मदत होते. म्हणून तुळशीच्या पानांचे सेवन रोज करणं गरजेच आहे. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी सूज आली असेल तर तुम्ही तुळशीची पानं लावू शकता. गरम पाण्यात तुळशी ड्रॉप्स घालून प्यायल्यानं सर्दी खोकला, कफची समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय फुफ्फुसंही निरोगी राहतात.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी काय करायचं?
डॉ. तनुजा नेसारी यांनी सांगितले की,''रोगप्रतिराकशक्ती वाढवण्याासाठी नियमित आवळ्याचा काढा, दूध, गुळवेल, शतावरी , च्यवनप्राश यांचे सेवन करायला हवे. संतुलित आहार घेऊन नियमित व्यायाम करा.''
भारतात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते?
पुढे त्यांनी सांगितले की, ''आपल्या देशात कोरोनाची पहिली लाट आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते. अनेक देशांमध्ये असे दिसून आले आहे. वातावरणातील बदलांमुळे व्हायरसचं स्वरूपही बदलत आहे. त्यामुळे मार्च किंवा फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. म्हणून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं जात आहे. याशिवाय संधी मिळाल्यास लसीकरण जरूर करा. संक्रमणापासून वाचण्यासाठी काय करायला हवं. याचा विचार करणं महत्वाचे आहे.'' ..म्हणून भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
व्हायरस हाताद्वारे तोंडातून किंवा नाकातून शिरतो, म्हणून तुम्ही जिथे जाल तिथे हात स्वच्छ ठेवा आणि श्वास घेताना व्हायरस आपल्या नाकात जाऊ शकतो, म्हणून बाहेर पडण्यापूर्वी दोन थेंब तीळ तेल, नारळ तेल, तूप किंवा मोहरीचे तेल नाकात घालावे. यामुळे, विषाणू नाकात शिरतानाही तेथे उपस्थित अनुनासिक एपिथिलियमच्या संपर्कात येत नाही. जेव्हा आपण मास्क घालून बाहेर येता तेव्हा आपल्या नाकावर दुहेरी संरक्षण कवच असते. 'चिंताजनक! लसीकरणाला सुरूवात होताच कोरोना लसीबाबत चीनी वैज्ञानिकांचा खुलासा