- मयूर पठाडेकाही ठराविक काळ असतो, या काळात आजारी पडण्याचं प्रमाण सर्वसामान्यपणे वाढतं. उदाहरणार्थ पावसाळा. पावसाळ्यात पेशंट्सनी डॉक्टरांचे दवाखाने भरलेले दिसतात. त्या तुलनेत हिवाळा हेल्दी समजला जातो. या काळात काहीही खा, भरपूर व्यायाम करा आणि तब्येत सुधरवा, असं म्हटलं जातं. पण थंडीच्या दिवसांत एक मुख्य गोष्ट अनेकांच्या बाबतीत घडते. ती म्हणजे आळस आणि शरीराचं चलनवलन कमी होणं.थंडी असल्यामुळे अनेक जण अंथरुणात पडून राहायला प्राधान्य देतात. या काळात तुम्ही व्यायाम केलात, शरीर तंदुरुस्त ठेवलंत तर उत्तमच, पण बाहेरच्या कडाक्याच्या थंडीमुळे या थंडीत कुठेच बाहेर न पडता उबदार वातावरणात या थंडीचा आनंद घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. पण त्यामुळेही तुम्हाला आजारांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात जे विषाणू आपल्या शरीरावर आक्रमण करतात त्यांना ‘विंटर बग्ज’ म्हटलं जातं. त्यामुळे ताप वगैरे येण्यासारखे प्रकार घडतात. शिवाय हे विषाणू संसर्गजन्य असतात. म्हणजे एकाला तो आजार झाला की त्याच्या संपर्कात येणाºयांनाही हा आजार होण्याची शक्यता खूप मोठी असते. आधीच थंडीचे दिवस आणि त्यात आजारी पडलं की मग जे काही आपल्या शरीराचं थोडंफार चलनवलन व्हायचं तेही बंद होतं.त्यामुळे थंडीतल्या काळातलं इन्फेक्शन कमी करण्यासाठी काही सोप्या गोष्टी सहज करता येण्यासारख्या आहेत.काय कराल?रोज साबणानं हात स्वच्छ धुण्याची सवय स्वत:ला लावा.तुम्हाला जर आजारी पडल्यासारखं वाटत असेल, तर बाहेर जास्त फिरू नका आणि आजारी व्यक्तींचा संपर्क आवर्जुन टाळा. घरातच कोणी आजारी पडलं असेल तर योग्य ती काळजी जरूर घ्या.सर्दी-खोकला झाल्यास रुमाल, टिश्यू पेपरचा वापर करा.एका वेळेला एकदाच टिश्यू पेपरचा वापर करा.योग्य ते व्हॅक्सिन्स वेळच्या वेळी घ्या.
‘हेल्दी’ थंडी बिघडवू शकते तुमची हेल्थ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 3:13 PM
संसर्गजन्य विंटर बग्जपासून राहा सावधान..
ठळक मुद्देथंडीतल्या काळातलं इन्फेक्शन तुमचं आरोग्य बिघडवू शकतं.रोज साबणानं हात स्वच्छ धुण्याची सवय स्वत:ला लावा.आजारी व्यक्तींचा संपर्क आवर्जुन टाळा. घरातच कोणी आजारी पडलं असेल तर योग्य ती काळजी जरूर घ्या.