निरोगी आणि दीर्घायुषी जीवन सगळ्यांनाच हवं असतं. अर्थात यासाठी हेल्दी आहार घेणं गरजेचं आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. दिवसभरात तुम्ही जास्तीत जास्त हेल्दी पदार्थाचे सेवन करत असाल पण वेळ मात्र चुकत असेल तर आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सकाळचा नाष्ता करणं शरीरासाठी खूप आवश्यक असतं.
कामाच्या घाईगडबडीत असताना अनेक लोक नाष्ता न करताच कामाला लागतात. असं करणं खूप चुकीचं आहे. सकाळच्या नाष्त्यामुळे शरीराला उर्जा मिळत असते.सकाळचा नाष्ता करत असातना काही पदार्थांचा आहारात समावेश न केल्यास उत्तम ठरेल. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत. जे तुम्ही सकाळी १० वाजताच्या सुमारास खाणं शरीरासाठी घातक ठरू शकतं.
फ्लेक्स
पॅनकेक
अनेकांना सकाळी ऑफिसला गेल्यानंतर पॅनकेक्स, कुकिज खाण्याची सवय असते. यामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे भूक वाढते. तसंच यात ट्रांस फॅट्स असतात. जे आरोग्यासाठी हानीकारक असतात.
मैदायुक्त पदार्थ
सकाळी उठल्यानंतर नाष्ता करताना पौष्टीक आहार घ्या. मैदायुक्त पदार्थ टाळा. अशा पदार्थांच सेवन केल्यास तुमचे पोट भरेल पण जास्त वेळ उर्जा राहणार नाही. आणि काही वेळानंतर झोप यायला सुरूवात होईल. म्हणून शरीरासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सकाळी सकाळी गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास महागात पडू शकतं. आणि शरीराचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे योग्य आहार घ्या. आणि शरीर उत्साही ठेवा.
फ्रुट ज्यूस
फ्रुट ज्यूसमध्ये आर्टिफिशियल फ्लेवर्स असल्यामुळे सोडा आणि साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे कॅलरीज वाढतात. तसंच पचनक्रिया व्यवस्थित राहत नाही. त्यापेक्षा तुम्ही सकाळच्या नाष्त्यासाठी ताजी फळं खाण्याचा प्रयत्न करा.