आजकाल धकाधकीच्या जीवनात आयुष्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि सुस्त जीवनशैलीमुळे लोकांना गॅस, अॅसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होतात. ज्यामुळे इतरही अनेक आजारांचा सामना करावा लागतो. जास्तीत जास्त आजार हे पोटापासूनच सुरू होतात असं म्हटलं जातं.
जर तुमची पचनक्रिया चांगली नसेल किंवा पोट खराब असेल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी सतत औषधांचा वापर करणंही आरोग्यासाठी चांगलं नसतं. यासाठी काही घरगुती उपायही बेस्ट ठरतात. तसेच जेवतानाचे काही नियम देखील आहेत. त्याचं पालन केल्यास अन्न नीट पचण्यास नक्कीच मदत होते. त्या नियमांबद्दल जाणून घेऊया....
नियम 1 - जेव्हा भूक लागते तेव्हाच आपण अन्न खाल्लं पाहिजे आणि जेवढी भूक लागते तेवढंच अन्न आपण खाल्लं पाहिजे. जेव्हा आपल्याला कडकडून भूक लागते. तेव्हा आपल्या पोटामधला जाठरागणी प्रदिप्त असतो. त्यामुळे खाल्लेलं अन्न हे उत्तमरित्या पचलं जातं.
नियम 2 - प्रत्येक घास खात असताना आवडीने, मनापासून, चवीचवीने चावून चावून आणि वास घेत घेत खाल्ला पाहिजे. चावून चावून खा हे आपलं ऐकलं आहे पण वास घेत घेत खा असं सांगितलं कारण जेव्हा आपण डोळ्यांनी अन्नाला पाहतो किंवा नाकाने वास घेतो, तेव्हा त्याचे सिग्नल्स आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतात. पुन्हा ते सिग्नल्स आपल्या इनटेस्टाईन आणि लिव्हरपर्यंत पोहोचतात. जेणकरून जे पाचक रस सेक्रिट होत असतात, ज्यामुळे अन्नाचं पचन होतं, ते उत्तमरित्या सेक्रिट होतील आणि जास्त प्रमाणात सेक्रिट होतील, म्हणून हे नीट लक्षात ठेवा.
नियम 3 - जेवण जेवत असताना पाणी पिऊ नका. पण जर एखादा घास जड जातोय, एखादा घास आपल्याला तिखट लागतोय आणि पाण्याची आपल्याला खूप आवश्यकता भासतेय तर तुम्ही एक घोट पाणी पिऊ शकता. पण शक्यतो जेवण जेवत असताना पाणी पिऊ नका. साधारण तासाभराने तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी पिऊ शकता. याने जाठरसही चांगले सेक्रिट होतात आणि पचनही खूप चांगल्या प्रमाणात होतं. सुहासिनी योग या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माहिती देणारा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.