यकृत हे आपल्या शरीराचे पॉवरहाऊस म्हणून काम करते. प्रथिने आणि कोलेस्ट्रॉलच्या निर्मितीपासून ते जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेटस साठवण्यापर्यंत अनेक महत्त्वाची कार्ये करते. अल्कोहोल, ड्रग्ज आणि चयापचय यातून बाहेर पडणारे विषारी पदार्थ घालवण्याची ते महत्त्वाची भूमिका बजावते. चांगले आरोग्य राखण्यासाठी आपले यकृत योग्य आकारात राखणे महत्त्वाचे आहे. त्याच्या आकारात झालेला बदल आणि सूज अनेक रोगांचे कारण बनते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थ आणि पेयांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे आपले यकृत निरोगी (How to Keep Liver Healthy) राहते.
कॉफी आणि चहा -हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, कॉफीचे सेवन यकृतासाठी फायदेशीर आहे. कॉफीमुळे यकृतातील अँटिऑक्सिडंट्सची पातळी वाढते आणि जळजळ कमी होते. यकृत रोग, कर्करोग आणि फॅटी यकृताचा धोका कमी करण्यास त्यामुळे मदत होते. याशिवाय ब्लॅक आणि ग्रीन टी यकृतातील एन्झाईम्स आणि फॅटची पातळी सुधारू शकते. आपण ग्रीन टीचा अर्क घेत असाल तर काळजी घ्या, कारण त्यामुळे त्रास होऊ शकतो. मात्र, जास्त प्रमाणात चहा-कॉफी पिणं त्रासदायक ठरू शकते.
ग्रेपफ्रूट, द्राक्षे आणि बेरी -द्राक्षांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स यकृताची जळजळ कमी करण्यासाठी आणि त्याची संरक्षणात्मक यंत्रणा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय काही अभ्यासात असेही आढळून आले आहे की द्राक्षे यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करतात. यकृताला होणारे नुकसान टाळता येते. जांभळामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, जे यकृताचे नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात. ते रोगप्रतिकारक आणि अँटिऑक्सिडंट प्रतिसाद सुधारण्यास देखील मदत करू शकतात.
बीट रस आणि ऑलिव्ह तेल -बीटचा रस यकृताला ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि जळजळ होण्यापासून वाचवण्यास मदत करतो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की ऑलिव्ह ऑइलचा वापर यकृतातील चरबीची पातळी कमी करण्यास, रक्त प्रवाह वाढविण्यास आणि यकृतातील एन्झाईम्सची पातळी सुधारण्यास मदत करतो. स्वयंपाक करताना तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. यामुळे तुम्हाला आणखी बरेच फायदे मिळतील.
पालेभाज्या आणि अक्रोड -ब्रोकोली आणि ब्रसेल्स स्प्राउट्स सारख्या भाज्या यकृतातील नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन एन्झाइम्स वाढवण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि यकृत एंझाइमची रक्त पातळी सुधारते. अक्रोडाचे सेवन यकृतातील एन्झाईम्सची पातळी सुधारून अनेक आजारांपासून बचाव करते.