अलिकडच्या काळात वयस्कर लोकांप्रमाणेच लहान मुलांमध्ये देखील आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लठ्ठपणा, मधुमेह, अॅनिमीया, यांसारख्या आजारांचासामना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातील लोकांना करावा लागत आहे. अशात रोगांपासून बचाव करण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.
(image credit-occupationaltherapy.com.au)लहान मुलांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहाराकडे विषेश लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांनी आहारात डाळी, भाज्या, फळे, भाकरी, चपाती यांचा समावेश करायला हवा असे युनिसेफ या संस्थेमार्फत मुलांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या पुस्तकात नमुद करण्यात आले आहे. यात असा उल्लेख केला आहे की, ज्या मुलांचे वजन अधिक असते किंवा, ज्या मुलांचं वजन फार कमी असते, (अंगात रक्ताची कमी असणे) अशी मुलं ही २० रूपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध होणारा आहार घेऊन आपल्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या समस्या सोडवू शकतात.
मुलांच्या आरोग्याशी निगडीत असलेली ही पुस्तिका नॅशनल न्युट्रिशियन सर्वे २०१६-२०१७ यावर आधारीत आहे. ५ वर्षीपेक्षा कमी वयोगटातील मुले लठ्ठपणा आणि वजन कमी असण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. तर १८ ते ४० या वयोगटातील व्यक्ती या अॅनिमिया या अजाराने ग्रस्त आहेत. त्याच जोडीला शाळकरी मुलांमध्ये लठ्ठपणा, कुपोषण आणि मधुमेह यांसारखे धोकादायक आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अनेकदा लहान मुले ही खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करताना आढळतात. त्यामुळे बराचसा पालकवर्ग हा मुलांच्या निष्काळजीपणाने त्रस्त असतो. त्यासाठी या सहा टिप्स अवलंब केला तर पालकांची चिंता दूर होण्यास मदत होईल.
१) आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी पॅक फूड खाणे टाळून ताजे अन्नपदार्थ खावेत.
२) कर्बोदके, जीवनसत्त्वांनी, परिपुर्ण असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
३) ताजी फळे किंवा फळांचा रस मुलांनी नियमीत प्यायला हवा.
४) भाज्या, चपाती यांचा आहारात समावेश करा.
५) तेलकट पदार्थांचे अतिसेवन करू नये.
६) कडधान्ये, पालेभाज्या यांचा समावेश करा.