Healthy Heart Tips: जर तुम्हाला तुमचं हृदय फिट ठेवायचं असेल तर तुम्हाला एक हेल्दी रूटीन फॉलो करावं लागेल आणि नियमितपणे व्यायाम करावा लागेल. या दोन सवयींचा लाइफस्टाईलमध्ये समावेश करा आणि शक्यतो प्रयत्न करा की, डाएट हेल्दी ठेवा. हार्ट संबंधी समस्या नेहमीच आपल्या खाण्या-पिण्यामुळे आणि बदलत्या लाइफस्टाईलमुळे होत असतात. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा हाच सल्ला दिला जातो की, आहार चांगला घ्या आणि नियमित व्यायाम करा. पण जास्तीत जास्त लोक बिझी लाइफस्टाईलमुळे आपल्या हृदयाची काळजी घेत नाहीत.
असं मानलं जातं की, हार्ट अटॅकचं मुख्य कारण नियमितपणे एक्सरसाइज आणि खाण्या-पिण्यावर लक्ष न देणं आहे. अशात आम्ही तुमच्यासाठी काही उपयोगी टिप्स घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या आपल्या हार्टची काळजी घेऊ शकता.
हेल्दी हार्टसाठी गरजेची आहे हेल्दी डाएट
सर्वातआधी तर आपल्या डाएटमध्ये बदल करा आणि प्रयत्न करा की, हेल्दी हार्टसाठी डाएट हेल्दी घ्या. वय कोणतंही असो हेल्दी डाएट फार गरजेची आहे. हिरव्या भाज्या आणि फळांचं अधिक सेवन हार्टसाठी चांगलं आणि जंक फूड व रेड मीटचं सेवन हार्टसाठी नुकसानकारक मानलं जातं. तसेच भरपूर प्रमाणात पाणी पिणंही गरजेचं आहे.
प्रयत्न करा की, एक रूटीन लाइफ फॉलो करा. तुमचं रूटीन बदललं की, तुमच्या हार्टला समस्या होऊ शकते. नियमित आवश्यक तेवढा व्यायाम करा, पायी चाला, भाज्यांचं सेवन करा आणि भरपूर पाणी प्या. तसेच चुकीच्या सवयी पूर्णपणे दूर करा. तरच तुमचं हार्ट हेल्दी राहू शकतं.