शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

हार्ट अटॅकची 'ही' लक्षणं साधी समजुन दुर्लक्ष करु नका, ठरु शकतात सायलेंट किलर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 2:50 PM

हृदयविकाराचा धक्का हा अचानक न येता, कित्येक वेळा आधीच काही ‘सायलंट हार्ट ॲटॅक’ (Silent heart attack) येऊन गेल्याचीही शक्यता अधिक असते. मात्र तेव्हा जाणवणाऱ्या लक्षणांकडे लोकं दुर्लक्ष करतात. हृदयविकाराच्या अशाच काही साध्या वाटणाऱ्या मात्र गंभीर लक्षणांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

छातीत दुखणं हे हृदयविकाराच्या (Heart Attack Symptoms) धक्क्याचं प्रमुख लक्षण असलं, तरीही इतर बरीच लक्षणं आहेत जी आपल्याला कदाचित कधी समजतही नाहीत. एवढंच नाही, तर हृदयविकाराचा धक्का हा अचानक न येता, कित्येक वेळा आधीच काही ‘सायलंट हार्ट ॲटॅक’ (Silent heart attack) येऊन गेल्याचीही शक्यता अधिक असते. मात्र तेव्हा जाणवणाऱ्या लक्षणांकडे लोकं दुर्लक्ष करतात. हृदयविकाराच्या अशाच काही साध्या वाटणाऱ्या मात्र गंभीर लक्षणांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

कार्डिऑलॉजिस्ट डॉ. रॉबर्ट ग्रीनफील्ड (MD) यांनी याबाबत माहिती सांगितली आहे. कॅलिफोर्नियातील फाउंटन व्हॅलीमध्ये असणाऱ्या ऑरेंज कोस्ट मेडिकल सेंटरमधील मेमोरिअल केअर हार्ट अँड व्हॅस्क्युलर इन्स्टिट्युटमध्ये (MemorialCare Heart & Vascular Institute) ते कार्यरत आहेत. रॉबर्ट सांगतात, 'हृदय बंद पडणं हे केवळ हृदयविकाराच्या धक्क्यानेच नाही, तर हळूहळूदेखील होऊ शकतं. अशावेळी दिसणाऱ्या लक्षणांकडे लोक अपचन किंवा इतर काही त्रास समजून दुर्लक्ष करतात. मात्र, या लक्षणांकडे तुम्ही जेवढं दुर्लक्ष कराल, तेवढा तुम्हाला अधिक धोका निर्माण होऊ शकतो.” गेट पॉकेटनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कोणती आहेत ही लक्षणं?हृदय कमकुवत होत असण्याचं पहिलं लक्षण म्हणजे मोठ्या प्रमाणात धाप लागणं. विशेषतः काहीही न करता बसल्या जागीच आपल्याला श्वास अपुरा पडतोय असं वाटत असेल, तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. डॉ. ग्रीनफील्ड सांगतात, 'आपल्याला श्वासातून पुरेसा ऑक्सिजन (Oxygen) मिळत नाही असं वाटणं हे गंभीर लक्षण आहे. कारण त्याचा अर्थ तुमच्या हृदयाचा उजवा भाग पुरेशा प्रमाणात कार्यरत नसल्याचे दिसून येतं.'

दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे, व्यायाम करताना प्रमाणापेक्षा अधिक धाप लागणं. 'कित्येक वेळा व्यायामानंतर जर मोठ्या प्रमाणात धाप लागत असेल, तर लोक याला वाढलेल्या वजनाचा परिणाम समजून दुर्लक्ष करतात. मात्र हे वारंवार होत असेल, तर कदाचित समस्या ही तुमच्या हृदयाशी संबंधित असू शकते,' असं डॉ. ग्रीनफील्ड यांनी सांगितलं. 'लोक हृदयाशी संबंधित समस्येकडे दुर्लक्ष करून जिमला जाण्याचा विचार करतात; त्यांना खरं तर डॉक्टरकडे जाण्याची गरज असते', असेही ते म्हणाले.

तुम्हाला बराच वेळ उताणं झोपल्यास श्वासोच्छवासास (Breathing) अडचण येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा आपण उताणं झोपतो, तेव्हा पायातील बरंच रक्त हे रक्तवाहिन्यांमधून उलट हृदयाकडे जातं. तुमचं हृदय जर सुदृढ असेल, तर त्याला हा फ्लो मेंटेन करण्यास कोणतीही अडचण येत नाही. मात्र, तुमचं हृदय जर कमकुवत असेल, तर याउलट आलेल्या रक्ताला सांभाळणं त्याला शक्य होत नाही. यामुळेच तुम्हाला श्वास घेण्यास अडचण होते. अशा वेळी तुम्ही डोक्याखाली आणखी उशा घेऊन झोपल्यास, फुफ्फुसांवरील दबाव कमी होऊन श्वास घेण्यास मदत होऊ शकते.

हार्ट फेल्युअरपूर्वी आपल्या शरीरातील रक्त महत्वाच्या अवयवांकडे, विशेषत: मेंदूकडं वळवलं जातं. त्यामुळे इतर स्नायू आणि हातपाय यांसारख्या कमी-महत्त्वाच्या भागांना रक्तपुरवठा कमी होतो. परिणामी तुम्हाला अशक्तपणा (weakness) आणि थकवा (fatigue) जाणवू शकतो, असं डॉ. ग्रीनफिल्ड यांनी सांगितलं.

आपल्या शरीरात राखून ठेवलं गेलेले सर्व द्रव शेवटी बाहेर पडलेच पाहिजेत. यासाठी लघवीची यंत्रणा आहे, असं डॉ. क्विनोन्स-कामाचो (Dr. Quinones-Camacho) म्हणतात. काहींना दिवसातून वारंवार लघवी लागते विशेषतः मध्यरात्री. झोपेच्या वेळी खूप पाणी प्यायल्यानं किंवा वृद्धत्वाचं लक्षण म्हणून याकडं दुर्लक्ष केलं जातं. तर काही लोक लघवी लागू नये म्हणून पाणी पिण्याचं प्रमाणाचं कमी करतात. मात्र, याचा उलट परिणाम होण्याची शक्यता असते. कारण आपलं शरीर डिहायड्रेशन (dehydration) टाळण्यासाठी पाणी धरून ठेवण्यास सुरुवात करतं. जेव्हा ही परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा मात्र, डिहायड्रेशन टाळता येत नाही आणि हार्ट फेल्युअरची समस्या उद्भवते.

पायांना सूज येणं हे हृदय कमकुवत असण्याचे आणखी एक लक्षण आहे. न्यूयॉर्कमधील एनवाययू लँगॉन हेल्थ येथील कार्डिऑलॉजिस्ट डॉ. अड्रियाना क्विनोनेस-कॅमाचो (MD) यांनी याबाबत अभ्यास केला आहे. त्या सांगतात, जेव्हा तुमचं हृदय नीट काम करत नसतं, तेव्हा किडनीपर्यंतदेखील अगदी कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. परिणामी, तो अवयव रक्त राखून त्याची भरपाई करतो. यामुळे तुमच्या शरीराच्या खालच्या भागातील अवयवांवर परिणाम होतो. तुमचे हात, पाय आणि तळव्यांना सूज आलेली दिसते. तसेच मोठ्या प्रमाणात स्ट्रेच मार्क्सही दिसून येतात.

याचाच पुढचा टप्पा म्हणजे, तुमचे वजन अचानक वाढणे. कित्येक वेळा अचानक वाढलेलं वजन हे चरबी असल्याचा गैरसमज लोकांना होतो. मात्र, हे खरं तर फ्लुईड रिटेन्शनमुळे झालेलं ‘वॉटर वेट’ असतं. हे अगदी अचानक होतं, काही दिवसांमध्येच अगदी पाच पौंडांपर्यंत वजन वाढलेलं दिसू शकतं. तेव्हा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिमला जायचा विचार करत असाल, तर अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

तुमचं हृदय जर निरोगी नसेल तर तुमची पचनसंस्थादेखील (digestive system) धोक्यात येते. शरीरातील रक्त अति महत्त्वाच्या अवयवांकडे वळवल्यामुळे तुमच्या पोटात आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये रक्त पुरवठा कमी होतो. त्यामुळे पचनसंस्थेचं कार्य मंदावू शकतं, असं डॉ. ग्रीनफिल्ड म्हणतात. यामुळे अपचन, भूक न लागणे, मळमळ (nausea) आणि बद्धकोष्ठता (constipation) यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

डॉ. ग्रीनफिल्ड यांच्या मते, एखादी समस्या उद्भवल्यास आपलं हृदय मेंदूच्या कार्याला प्राधान्य देत असलं तरी, रक्ताभिसरणाच्या (Blood Circulation) समस्येमुळे हृदय निकामी (heart failure) होऊ शकतं. जेव्हा असं घडतं तेव्हा तुमच्या मेंदूपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही आणि त्यामुळे चक्कर येणं, दिशाभूल होणं, स्मरणशक्ती कमकुवत होणं आणि एकाग्रता (concentration) कमी होणं यासारखी लक्षणं दिसू शकतात. काहीवेळा व्यक्ती बेशुद्धदेखील पडू शकते.

जर उबदार मोजे तुमच्या थंड पडलेल्या हाता-पायांना ऊब देवू शकत नसतील तर हे ब्लड सर्क्युलेशन समस्येचं आणखी एक लक्षण असू शकतं. त्यामध्ये वाढ झाल्यास हार्ट फेल्युअर उद्भवू शकतं. मात्र, तुम्हाला फक्त हे एकच लक्षण जाणवत असेल तर मग हार्ट फेल्युअरचा धोका नाही. कारण, अनेक लोकांचे हात-पाय थंड पडत (colder hands and feet) असतात. पण, जर वर दिलेल्या इतर लक्षणांपैकी एखाद्या जरी लक्षणासोबत हात-पाय थंड पडत असतील तर धोका असू शकतो.

अशा काही युक्त्या आहेत ज्या किरकोळ लक्षणं दूर करण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ रात्री झोपताना डोके थोडंस उंचावर ठेवावं, जास्त पाणी पिणं आणि धूम्रपान टाळणं. मात्र, जर लक्षणं जास्त प्रमाणात जाणवत असतील तर ही गोष्ट अतिशय गंभीर ठरू शकते, त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांचे उपचार आणि आरोग्यदायी सवयींच्या मदतीनं हार्ट फेल्युअर टाळता येऊ शकतं, असं डॉ. ग्रीनफिल्ड म्हणाले.

अमेरिकेतील नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सुमारे 5.7 दशलक्ष लोकांना हृदयविकार आहे. विशेष म्हणजे, केवळ प्रौढांमध्येच नाही, तर लहान मुलांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. यातील कित्येक जण हे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचे रुग्ण आहेत. आपल्या हृदयामार्फत होणाऱ्या रक्तपुरवठ्यासंबंधी काही अडचणी येत असतील, तर त्याला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणतात. यामध्ये हृदयाचे काम सुरूच असते, मात्र ते जितक्या ताकदीने आणि सुरळीतपणे व्हायला हवे, तेवढे होत नसते. यामुळे मग शरीरातील तुमच्या इतर अवयवांपर्यंत रक्तपुरवठा होण्यास अडचण निर्माण होते. याचाच दुसरा प्रकार म्हणजे, तुमच्या हृदयापर्यंत पुरेसे रक्त पोहोचवण्यास अडचण निर्माण होणे. यामुळे हृदयातून बाहेर ढकलले जाणारे रक्तही कमी होते. या दोन्ही परिस्थितींकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.

सध्या तरी हृदयविकारावर पूर्णपणे परिणामकारक अशी उपचार पद्धती उपलब्ध नाहीये. मात्र उपचारांपेक्षा खबरदारी चांगली, या उक्तीप्रमाणे; हृदयविकारासंबंधी लक्षणे वेळेवर ओळखून त्यानुसार आपली लाईफस्टाईल बदलणे तर आपल्याला नक्कीच शक्य आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटका