Heart Attack: आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच हार्ट अटॅकने मृत्यूचं होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. यातील एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी. लोकांची शारीरिक हालचालही कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्या लगेच होतात.
अशात लोक वेळोवेळी आपलं चेकअप करत असतात. ब्लड टेस्टच्या माध्यमातून हार्ट अटॅक येणार का किंवा कधी येणार? याची माहिती घेत असतात. अशात तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, ब्लड टेस्टने हार्ट अटॅकची माहिती कशी मिळते? तेच आज जाणून घेऊ....
ब्लडमध्ये काही खास प्रोटीन असतात. ज्यांद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की, भविष्यात तुम्हाला हार्ट अटॅक कधी येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे टेस्ट केल्यावर सहा महिनेआधीच माहीत पडतं की, हार्ट अटॅक कधी येणार आहे.
नुकताच एक रिसर्च 1 लाख 69 हजार लोकांवर करण्यात आला. यात त्यांच्या ब्लड सॅम्पल घेण्यात आले. या रिसर्चमध्ये सहभागी लोकांना आधी कोणताही हृदयरोग झाला नव्हता. यातील 420 लोकांना 6 महिन्यांच्या आत हार्ट अटॅक आला.
टेस्ट दरम्यान ब्लडमध्ये असे मॉलिक्यूल मिळाले ज्याद्वारे स्पष्टपणे समजतं की, त्यांना हार्ट अटॅक येणार आहे. मॉलिक्यूल एक असं प्रोटीन आहे जे हृदयाच्या सेल्सवर दबाव वाढवतं. तेव्हा हे मॉलिक्यूल तयार होतं.
ऑनलाइन टूलच्या माध्यमातून गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉलची माहिती मिळवता येते. या टूल्सच्या माध्यमातून कंबरेच्या जाडपणाची माहिती सहज मिळवता येते.
या टूलच्या माध्यमातून सहा महिन्यात हार्ट अटॅकची माहितीही मिळवता येऊ शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला भविष्यात हार्ट अटॅक येणार आहे की नाही याची माहिती सहजपणे मिळवता येऊ शकते. पण याला काही केसेस अपवाद ठरू शकतील.