थंडी पडायला सुरुवात झाली आहे. सर्दी, खोकला, ताप येणे या गोष्टी सामान्यच आहेत. मात्र आणखी काही गंभीर आजार हिवाळ्यात लगेच होऊ शकतात. थंडीत हृदयाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी हृदयाची काळजी घेण्याची जास्त गरज आहे. हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कोणामध्ये जास्त असते हे बघुया. ताणतणाव, बदललेली जीवनशैली यामुळे आजकाल अगदी तरुणयातही हार्टअटॅकचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यापासून वाचण्यासाठी काय केले पाहिजे वाचा
युरोपियन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीच्या संशोधनानुसार ज्यांचे वजन जास्त असते किंवा जे स्थुलमुळे त्रस्त आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय उच्चरक्तदाब असलेल्या व्यक्तींनीही थंडीत जास्त काळजी घ्यावी. थंडीत हार्टअटॅक येण्याचे प्रमाण ३० पटींनी वाढते.
सकाळी धोका जास्त
थंडीत नसा आखुडल्या जातात. यामुळे रक्तदाब वाढतो. उच्चरक्तदाब हार्टअटॅक येण्याचे मूळ कारण असू शकते. शरीरात रक्त साठून राहते, रक्तनलिकांमधून नीट पुरवठा होत नाही. सकाळी तापमान खूपच कमी असते. बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेण्यात शरीराला काहीसा वेळ लागतो. शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी रक्तदाब वाढतो आणि हेच हार्टअटॅकचे कारण बनते.
अशी घ्या काळजी
पहाटे पहाटे बाहेर फिरायला जाणे शक्यतो टाळावे. ९ नंतर बाहेर गेल्यास थंडी थोडी कमी झालेली असते. जेवणात कमीत कमी मीठ खावे. शरीरासाठी व्हिटॅमिन डी गरजेचे आहे यासाठी कमी मीठ खा. तसेच व्यायाम नियमित करावा.