शहरं
Join us  
Trending Stories
1
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
2
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
3
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
4
Team India Arrival LIVE: टीम इंडियाचे 'हार्दिक' स्वागत; रोहितसेनेला पाहण्यासाठी उसळला चाहत्यांचा महासागर
5
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
6
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांचा घणाघात
7
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार
8
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
9
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
10
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
12
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
13
Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...
14
Victory Parade : Team India च्या विमानाला असाही 'सॅल्युट'! अनोख्या घटनेने वेधले सर्वांचे लक्ष
15
टोमॅटो पुन्हा २०० पार जाण्याची शक्यता; मुंबई, देशभरातील आत्ताचे दर काय...
16
विश्वविजेत्या टीम इंडियाला भेटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली युझवेंद्र चहलची खास विचारणा, म्हणाले, ‘’हाच का तो…’’
17
राहुल गांधींनी हाती घेतले फावडे अन् कामगारांसोबत थापीही फिरवली!
18
इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video
19
'T20 वर्ल्ड चॅम्पियन्स'च्या कुटुंबीयांना भेटले PM मोदी; BCCIकडून पंतप्रधानांना स्पेशल 'जर्सी'!
20
ब्रिटनमध्ये ऋषी सुनक दारुण पराभवाच्या छायेत? सर्व्हे आला, आज मतदानाला सुरुवात

Heart Attack : दुर्लक्ष करु नका अशा दुखण्याकडे !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 10:04 AM

हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यापैकी सुमारे एक तृतीयांश रुग्णांना माहित नसते की, त्यांना ह्रदय विकार आहे आणि हॉस्पिटल पोहचण्याअगोदरच त्यांचा मृत्यू होतो.

-Ravindra Moreहार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यापैकी सुमारे एक तृतीयांश रुग्णांना माहित नसते की, त्यांना ह्रदय विकार आहे आणि हॉस्पिटल पोहचण्याअगोदरच त्यांचा मृत्यू होतो. याला जबाबदार सर्वात मोठे कारण म्हणजे पहिल्यांदा आलेल्या हार्ट अटॅकला आपण ओळखूच शकलो नाही. अशा हार्ट अटॅकचे लक्षणे अस्पष्ट असतात म्हणून आपण ओळखू शकत नाही, यालाच सायलेंट हार्ट अटॅकदेखील म्हणतात. काय आहेत सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे :* छातीत अस्वस्थताछातीत अस्वस्थता वाटणे हार्ट अटॅकचे पहिले संभाव्य लक्षण आहे. यादरम्यान अस्वस्थता किं वा दुखण्याचा त्रास होऊ शकतो. याशिवाय छातीच्या मध्यस्थानी काही मिनिटांपर्यंत दबाव किंवा घट्टपणादेखील वाटू शकते. * घाम येणेया परिस्थितीत आपणास विनाकारण खूपच घाम येऊ शकतो. सोबतच आपणास थंडीदेखील वाटू लागेल. आपली त्वचा स्टिकी होऊ शकते. शिवाय आपणास ओमेटींग होण्यासारखेही वाटू शकते.  * श्वास घेण्यास अडथळाआपणास या दरम्यान श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, सोबतच आपण लांब श्वास घेण्याचा प्रयत्न करु लागतात. ही परिस्थिती विशेषत: छातीत अस्वस्थता होण्याअगोदर होऊ शक ते. कदाचित आपल्या छातीत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली आपणास समजणारही नाही. * शरीराच्या वरील भागात दुखणेदुखणे आणि अस्वस्थताची ही परिस्थिती छातीपासून आपले खांदे, बाहु, कंबर, मान, दात किंवा हिरड्यांपर्यंत पोहचू शकते. एवढेच नव्हे तर आपल्या शरीराच्या वरच्या भागात हे दुखणे विना अस्वस्थताचेही होऊ शकते. * या कारणाने येतो हार्ट अटॅकह्रदयापर्यंत रक्त पोहचविणाऱ्या नसांमध्ये गुठळ्या तयार झाल्यास ह्रदयापर्यंत रक्त प्रवाह सुरळीत होऊ शकत नाही. रक्त न मिळाल्यामुळे ह्रदयाच्या मांशपेशींमध्ये आॅक्सिजनची कमतरता भासते. जर लवकर रक्ताचा प्रवाह सुरळीत झाला नाही तर ह्रदयाच्या मांशपेशींची गती थांबते. बहुतांश हार्ट अटॅकमध्ये मृत्यू गुठळ्या फुटल्याने होते.Also Read : ​रिमा लागू: धोकेदायक "कार्डियक अरेस्ट" ने झाला मृत्यु, ही आहेत लक्षणे !