शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

कमी वयात हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात या सवयी, वेळीच बदलल्या तर जीव वाचू शकतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 5:26 PM

Heart Attack Reason : कमी वयातही हार्ट अटॅकमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे असं कशामुळे होतंय याची काही कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत. चला जाणून घेऊया काय आहेत ती कारणे....

Heart Attack Reason : हार्ट अटॅक हा आजार किती गंभीर आहे हे आता कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. हार्ट अटॅक आधी वयाने मोठ्या लोकांनाच व्हायचा असा एक समज होता. पण आता कमी वयातही हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. अनेक अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यात कमी वयातही हार्ट अटॅकमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे असं कशामुळे होतंय याची काही कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत. चला जाणून घेऊया काय आहेत ती कारणे....

लाइफस्टाइलमधील बदल

आजची लाइफस्टाइल तरुणांमध्ये वेगवेगळ्या आजारांचं कारण ठरत आहे. एकाच जागी बसून काम करण्याची सवय, जंक फूड, फास्ट फूड, पुरेशी झोप न घेणे, मद्यसेवन आणि धुम्रपान यामुळे कमी वयाच्या तरुणांनाही हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे. यातील काहींना तर उपचार घेण्याचीही संधी मिळत नाही आणि ते जीव गमावून बसतात. कमी वयात हार्ट अटॅकचं कारण जेनेटिक असतं, आणि आताची खराब लाइफस्टाइल हा आजार आणखी वाढवतात. 

सिगारेटची सवय

धुम्रपान हे हृदयासाठी किती घातक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. याने हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो. जर तुम्हाला ही सवय असेल ती लगेच सोडाय कारण सिगारेटमुळे आणि त्यातील तंबाखूमुळे शरीरातील ऑक्सिजनवर नकारात्मक प्रभाव पडतो. सोबतच तंबाखूमुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. धुम्रपान आणि मद्य यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त वाढतं. त्यामुळे हार्ट अटॅक येतो. 

टेंशन आणि अपयशाचा दबाव

तणाव हा हृदयासाठी फारच घातक असतो. डिप्रेशनमुळे हृदयाचा आजार गंभीर रूप धारण करतो. अनेकदा हे जीवघेणंही ठरू शकतं. एका शोधानुसार, हृदय रोगाच्या प्रत्येक 5 रुग्णांपैकी एकाला गंभीर डिप्रेशनची समस्या असते. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, राग, चिडचिड यामुळे रक्तदाब वाढतो. डिप्रेशनने ग्रस्त लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता 4 पटीने जास्त असते. 

शारीरिक मेहनतीची कमतरता

आपल्या शरीरासाठी जितका आहार गरजेचा असतो तितकाच त्या आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा योग्य वापर करणं गरजेचं असतं. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात 500 ते 950 कॅलरीज बर्न करण्यासाठी योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल महत्वाची असते. जर तुम्ही शरीराची फार हालचालच करत नसाल तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम नाही केल तरी शारीरिक हालचाली होणं गरजेचं आहे. 

वजन वाढणं

जर तुम्हाला हृदयाशी संबंधित रोगांना दूर ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला वजन कमी ठेवायला हवं. जाडपणा ही सवय नाहीये, हा चुकीचं खाणं-पिणं आणि अंसतुलित जीवनशैलीचा परिणाम आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, जाडेपणा उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि इन्सुलिन रेजिस्टेंस यांचं नेतृत्व करतो. याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. 

चुकीचं खाणं-पिणं

कमी कोलेस्ट्रॉल असलेला आहार हृदयाचा सर्वात चांगला मित्र असतो. ट्रान्स फॅटमुळे हृदय रोगाची समस्या अधिक वाढते. ओमेगा -3 फॅटी अॅसिडने भरपूर पदार्थ हृदय रोगाची शक्यता कमी करतात. फास्ट फूडच्या सेवनामुळे हृदय रोगाची शक्यता अधिक वाढते.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स