Heart Attack : अलिकडे वेगवेगळ्या कारणांना लोकांना हार्ट अटॅकचा धोका खूप जास्त वाढला आहे. आता तर कमी वयातही हार्ट अटॅकने तरूणांचा जीव जात आहे. नुकतीच थंडीला सुरूवात झाली. या दिवसातही हा धोका खूप वाढतो. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयासंबंधी समस्यांचा अधिक सामना करावा लागतो. हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते.
थंडीत शरीराचं तापमान कमी झालं की, आपलं सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतं आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे हार्ट रेट, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोकाही वाढतो. या सर्व गोष्टींमुळे हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका वाढतो. अशात एक्सपर्टनी हिवाळ्यात हृदय फिट ठेवण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत.
रोज व्यायाम
हिवाळ्यात दिवसातून कमीत कमी 30 मिनिटे एक्सरसाइज नक्की करावी. या दिवसात घराबाहेर एक्सरसाइज करणं टाळा. कारण बाहेर थंडी जास्त असते. अशात तुम्ही योग्यप्रकारे एक्सरसाइज करू शकणार नाही. तुम्ही सायकलिंग, ट्रेडमिल, योगासारखे इनडोर एक्सरसाइज करू शकता.
किमान 8 तास झोप
हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घेणं फार गरजेचं असं. सोबतच काम करताना मधे मधे ब्रेक घेत रहा. दिवसातून 7 ते 8 तास झोप शरीरासाठी गरजेची असते. पण त्यापेक्षा जास्त वेळ झोपाल तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.
स्ट्रेस टाळा
हार्ट अटॅक आणि हृदयासंबंधी आजारांचं मुख्य कारण स्ट्रेस असतो. एक्यूट स्ट्रेसमुळे थेट हार्ट अटॅक येऊ शकतो आणि क्रोनिक स्ट्रेसने हृदयाच्या धमण्यांच्या आतील थरात बदल होऊ शकतो. ज्याने सूज येऊ शकते, ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात आणि सोबतच हार्ट अटॅकही येऊ शकतो.
आवडीचं काम करा
गार्डनिंग, पेंटिंग, रीडिंग आणि म्युझिक ऐकल्याने तणाव होतो. तुम्ही योगा आणि मेडिटेशनही करू शकता. याने तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यास बराच फायदा होऊ शकतो.
जास्त मीठ आणि साखर टाळा
आहारात सूर्यफूलाचं तेल किंवा सरसुच्या तेलाचा वापर करा. हे पॉलअनसॅचुरेटेड असतात. आपल्या रोजच्या आहारात सलाद आणि फळांचा समावेश करा. जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ खावीत. फास्ट फूडपासून दूर रहा. जास्तीत जास्त भाज्यांचं आणि मोड आलेल्या कडधान्यांचं सेवन करा.