आजकालची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे हृदयाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे. रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होऊ शकत नाही. परिणामी छातीत वेदना होतात. वारंवार हीच स्थिती उद्भवल्यास हार्ट अटॅकचा धोाका वाढतो.
व्यायाम केल्यानंतर किंवा धावून आल्यानंतर घाम येणं स्वाभाविक आहे. पण कोणतंही कारण नसताना जर तुम्हाला घाम येत असेल तर हृदयाच्या आजाराचे संकेत असू शकतात. अशावेळी मासपेशींना नुकसान पोहोचतं. अनेकदा हृदयापर्यंत रक्त पोहोचवत असलेल्या कोरोनरी वेन्समध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं. त्यामुळे रक्तप्रवाह कमी प्रमाणात होतो.
हृदयावर पडणारा दबाव आणि शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्याच्या प्रयत्नात जास्त घाम येतो. हात, खांदे, दात, डोकं किंवा जबड्याची समस्या उद्भवल्यास हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. अशा समस्या उद्भवल्यास निष्काळजीपणा महागात पडू शकतो. म्हणून वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ड्रग्स किंवा कोणत्याही गोष्टींची व्यसन केल्यास त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मेंदूवर होतो. एक्सपर्ट्सच्या मते कोकिन जास्त प्रमाणात घेणं हार्ट अटॅकचं कारण ठरत आहे.
प्रदूषणामुळेही हृदयाच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. वायू प्रदूषणात विषारी हवा आणि असे अनेक कण असतात. ज्यामुळे व्यक्तीच्या फुफ्फुसांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. एक्सपर्ट्सच्यामते खाण्यापिण्यात बदल करून हा धोका टाळता येऊ शकतो. मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. ताज्या भाज्या, फळं, दूग्धजन्य पदार्थ, ऑलिव्ह ऑईलचा आहारात समावेश करावा.
नवीन टुथब्रश घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, तरच पांढरेशुभ्र राहतील दात, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
याशिवाय हृदयाच्या आजारांपासून लांब राहण्यासाठी रोज नियमित हलका, फुलका व्यायाम करायला हवा. वेळोवेळी रक्तदाब तपासून घ्यायला हवं. फळं आणि हिरव्या भाज्या आपल्या आहाराचा भाग असावा. हवा प्रदूषणापासून वाचण्याचा प्रयत्न करावा. मास्कचा वापर करायला विसरू नका. जर तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.