बालपण आणि तरूणपणात केलेल्या काही चूकांमुळे वाढत्या वयात नुकसानाचा सामना करावा लागतो. तरूणांमध्येही अशा काही सवयी असतात. ज्यामुळे त्यांच्या हृदयावर नकारात्मक परिणाम होतो. तुम्हीसुद्धा आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं. २० ते ३० वर्षांच्या वयात लोक अशा काही चूका करतात ज्याचा थेट संबंध तुमच्या हृदयाशी असतो. सध्याच्या काळात तरूणांनाही हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे. याबाबत पुण्यातील कार्डीओलॉजिस्ट डॉ. केदार कुलकर्णी यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.
जास्त ताण घेणं
तरूणावस्थेत मुलं आपल्या भविष्याबाबत खूप चिंतीत असतात. त्यामुळे दीर्घकाळ डिप्रेशनमध्ये जातात. परिणामी हार्ट अटॅकचा धोका वाढतो. ताण तणावामुळे राग येणं स्वाभाविक आहे. पण यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. म्हणून ज्यामुळे जास्त ताण तणाव येईल अशा गोष्टींपासून लांब राहायला हवं. रोज योगा किंवा व्यायाम करायला हवा.
स्मोकिंग
डॉ. केदार यांनी सांगितले की, सध्याच्या स्थितीत तरूणांमध्ये स्मोकिंगच प्रमाण खूप वाढलं आहे. सिगारेटमधील निकोटीन (Nicotine)मुळे जास्त प्रमाणात ताण येतो. स्मोकिंगमुळे फक्त हृदयाची समस्या नाही तर फुफ्फुसांचा कॅन्सरही होऊ शकतो. डिमेंशियामुळे प्रजनन क्षमता देखिल कमी होऊ शकते. म्हणून हळूहळू का होईना स्मोकिंग करणं पूर्णपणे बंद करायला हवं.
फळं आणि भाज्यांचे सेवन न करणं
तरूणांमध्ये ही एक वाईट सवय देखील आहे की ते घरगुती भाज्या खाण्यापेक्षा जंक फूडकडे जास्त आकर्षित होतात. सर्व पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे शरीरातही या घटकांचा अभाव असतो, ज्यामुळे आपण रोगांचे बळी बनू शकता. एका संशोधनानुसार, योग्य प्रमाणात भाज्या खाल्लास हृदय आणि कॅन्सरचा धोका कमी असतो. लोह, फायबर, पोटॅशियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे तसेच भाज्या आणि सर्व आवश्यक पौष्टिकांनी समृद्ध असलेले फळांमध्ये असे काही गुणधर्म असल्याचे आढळून आले जे आपल्या हृदयाच्या आरोग्यास पोषक असतात.
‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित
फास्ट फूड
फास्ट फूडचे सेवन केल्याने तुमचे ब्लड प्रेशर तसेच शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हे आपल्या हृदयाचे नुकसान करू शकते. कोलेस्ट्रॉलच्या वाढीमुळे आपल्याला हृदयविकाराच्या झटक्यानेही जीव गमवावा लागू शकतो. तथापि, असे असू शकते की फास्ट फूड हळूहळू आपल्या हृदयाला हानी पोहचवते. फास्ट फूडमध्ये पोषक तत्त्वांची कमतरता असते.
CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
शारीरिक श्रमाचा अभाव
आपल्या शरीराला शारीरिक श्रम आवश्यक आहेत तितकचं पौष्टिक पदार्थांची आवश्यकता आहे. शरीरात शारीरिक श्रम नसल्यामुळे घरी बसून अनेक आजार होऊ शकतात. व्यायाम न करणे आळशी लोकांसाठी प्राणघातक ठरू शकते. असे लोक जे बहुतेक वेळ निष्क्रिय बसून किंवा आडवे राहतात, त्यांना हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो.