शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

पालकांनो सावधान! चिमुकल्यांमध्ये वाढू लागलाय हृदयविकार; काय असतील कारणे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 10:14 AM

लहान मुलांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आता वाढताना दिसू लागला आहे.

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे झाले आहे. आरोग्याकडे थोडा जरी निष्काळजीपणा केला तर तो महागात पडू शकतो. आपण अनेकदा वृद्धांमध्ये, तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचे ऐकले आहे. पण, लहान मुलांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आता वाढताना दिसू लागला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही मुलांना जन्मापासूनच हृदयविकाराचा धोका असतो.

जेव्हा आई गरोदर राहते, तेव्हा मुलांना जन्मजात हृदयविकाराची झळ बसते आणि त्यांना याच भीतीने आयुष्य काढावे लागते. या आजारात हृदय आणि रक्तवाहिन्यांवर जास्त प्रभाव पडतो. हा हृदयविकाराचा सर्वात मोठा धोका असतो.

मुलांना हृदयविकाराचा झटका का येतो? 

मुलांमध्ये हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे वेंट्रिक्युलर फायब्रिलेशनमुळे हृदयाच्या कार्यामध्ये समस्या. यामध्ये हृदयाचे वेंट्रिकल्स वेगाने आणि अनियमित स्वरूपात धडकू लागतात. हे सहसा हृदयाशी संबंधित जन्मजात समस्यांमुळे होते.

जंक फूडचा धोका :

लठ्ठपणा हे हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण असल्याचे हृदयरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुलांची शारीरिक हालचाल कमी होत असताना, फास्ट-जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे हा धोका खूप वाढला आहे. इतकेच नाही तर मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्हीमध्ये गुंतल्यानेही समस्या उद्भवत आहे.

 त्वचा किंवा ओठ निळसर रंगाचे होतात. खाण्यास त्रास होणे. धाप लागणे. थोडं जरी चालले तरी धाप लागणे. योग्यरित्या मुलांची वाढ न होणे. चक्कर येणे, सांधेदुखी आणि छातीत दुखणे.

लठ्ठपणा ठरतोय घातक :

आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. मुलांमध्ये हृदयविकारात वाढ भविष्यासाठी एक गंभीर बाब आहे. कारण वाईट जीवनशैलीमुळे केवळ प्रौढांनाच नाही तर मुलांच्या हृदयालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

निष्काळजीपणा ठरतोय कारणीभूत?

प्रौढांप्रमाणेच मुलांना हृदयविकाराचा धोका असू शकतो. जेव्हा हृदय अचानक शरीराच्या अवयवांना आणि ऊतींना प्रभावीपणे रक्त पंप करणे थांबवते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते, जी जीवघेणी ठरू शकते. लहान मुलांची यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. ताबडतोब मुलांना डॉक्टरांकडे नेऊन तपासण्या कराव्यात. -विश्वास सोळंखी, हृदयरोग तज्ज्ञ

 मुलांमधील हृदयविकाराची लक्षणे कोणती? 

 या संदर्भात आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की, सुदृढ बालकेही जन्माच्या वेळी हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत.

 पालकांचा निष्काळजीपणाही यामागे एक कारण असू शकते.

 त्यामुळे लहान वयातच रक्तदाब, शुगर, कोलेस्ट्राॅल यासारखे आजार मुलांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग