आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांचं रूटीन पूर्णपणे बदललं आहे. रात्री उशीरापर्यंत जागणं आणि सकाळी उशारीपर्यंत झोपणं जास्तीत जास्त लोकांचं डेली रूटीन झालं आहे. तुम्हाला माहीत आहे का की, रात्री उशीरापर्यंत जागी राहिल्याने हार्ट अटॅकचा (Heart Attack) आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका राहतो. इंग्लंडची एक एक्सेटर यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी नुकत्याच केलेल्या एका रिसर्चमद्ये हा दावा केला आहे.
वैज्ञानिकांनुसार व्यक्तीची झोपण्याची वेळ आणि हृदयरोग यात कनेक्शन आढळून आलं आहे. ते म्हणाले की, जर तुमची झोपायची वेळ अर्ध्या रात्री असेल किंवा उशीरा असेल तर तुमचं हार्ट डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे लोकांनी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका कमी करायचा असेल तर जास्त उशीरापर्यंत जागे न राहता १० ते ११ वाजत्या दरम्यान झोपलं पाहिजे.
वैज्ञानिक म्हणाले की, मनुष्याची झोप आणि हृदयरोग यांच्यात एक कनेक्शन आहे. जे लोक उशीरा झोपतात ते सकाळी उशीरा उठतात. त्यामुळे अर्थातच त्यांची बॉडी क्लॉक डिस्टर्ब होते. हार्टवर याचा वाईट परिणाम होतो. अशात रात्री लवकर झोपून तुम्ही हृदयरोगाचा धोका कमी करू शकता.
८८ हजार लोकांवर केला रिसर्च
वैज्ञानिकांनी सांगितलं की, 'आम्ही ४३ ते ७४ वयोगटातील ८८ ब्रिटीश वयस्कांवर रिसर्च केला. रिसर्चमध्ये सहभागी लोकांच्या हातात ट्रॅकर घालण्यात आलं होतं. ट्रॅकरच्या माध्यमातून त्यांची झोपण्याची आणि उठण्याची अॅक्टिविटी मॉनिटर केली गेली. त्यासोबतच त्यांना लाइफस्टाईलसंबंधी प्रश्नही विचारण्यात आले. अशा लोकांमध्ये पाच वर्षापर्यंत हार्ट डिजीज, हार्ट अटॅक, स्ट्रोक, हार्ट फेल्यूरचा रेकॉर्ड ठेवण्यात आला आणि त्यांची तुलना करण्यात आली'.
काय सांगतो रिसर्च?
रिसर्चचे रिझल्ट सांगतात की, ज्या लोकांनी दररोज रात्री १० ते ११ वाजता दरम्यान झोप घेणं सुरू केलं. त्यांच्यात हृदयरोगाच्या केसेस सर्वात कमी होत्या. तेच जे लोक अर्ध्या रात्रीनंतर झोपतात, त्यांच्यात हा धोका २५ टक्क्यांपेक्षा जास्त राहतो.
यूरोपियन हार्ट जर्नलमध्ये पब्लिश रिसर्च सांगतो की, 'आम्ही लोकांना प्रेरित करत आहो की लवकर झोपून हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो'. डॉ. डेविड प्लान्स म्हणाले की, २४ तास चालणारी शरीराची आतील घड्याळच आपल्या शारीरिक आणि मानसिक रूपाने निरोगी ठेवते. याला सरकेडियन रिदम म्हणतात. उशीरा झोपल्याने सरकेडडियन रिदम बिघडतो. त्यामुळे आरोग्य बिघडतं.