Heart attack : नोकरीसोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. काही लोक ऑफिससोबतच जिम आणि योगासारख्या गोष्टींना आपल्या लाइफस्टाईलचा भाग बनवतात. पण काही लोकांना वेळ मिळत नसल्याने या गोष्टींवर फोकस करणं अवघड असतं. अलिकडे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे.
हृदयरोग जगभरात मृत्यूचं मुख्य कारण आहे. दरवर्षी 17.9 मिलियन लोकांचा मृत्यू याच कारणाने होतो. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका अभ्यासानुसार, भारतात जवळपास 60 टक्के लोक हृदयरोगाने पीडित आहेत. एक्सपर्टनुसार, नोकरी करणारे लोक काही उपाय करून हृदयरोग टाळू शकतात.
1) कॉफीचं सेवन कमी करा
ऑफिसमध्ये काम करणारे लोक दिवसभर एनर्जी मिळवण्यासाठी कॉफीवर अवलंबून असतात. भलेही कॉफीचं सेवन आरोग्यासाठी चांगलं आहे, पण जास्त कॅफीनचं सेवन हृदयाची गति वाढवतं आणि रक्तदाबही वाढतो. ज्यामुळे घाबरल्यासारखं वाटू शकतं. अशात हार्ट अटॅक येऊ शकतो. अशात बचावासाठी केवळ सकाळीच कॉफीचं सेवन करा.
2) हेल्दी डाएट
ऑफिसमध्ये लागलेल्या वेंडिंग मशीनमधून लगेच काही खाणं सोयीस्कर ठरू शकतं. पण नेहमीच एका पौष्टिक पर्यायाची निवड करणं शरीर आणि हृदयासाठी फायदेशीर ठरतं. कधी कधी अशा वेंडिंग मशीनमधून काही खाणं ठीक आहे. पण आपला उर्जेचा स्तर कायम ठेवण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी पौष्टीक आहारच घ्यावा.
3) पूर्ण झोप घ्या
जर कुणी कामावर जाण्याआधी पुरेशी झोप घेत नसेल तर त्याना थकवा, चिडचिडपणा आणि कामावर फोकसची कमतरता जाणवते. कमी झोपेमुळे व्यक्तीच्या कामाच्या स्तर प्रभावित होतो, सोबतच त्यांच्या हृदयाच्या आरोग्यावरही प्रभाव पडतो. एका रिसर्चनुसार, कमी झोप घेणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग विकसित होण्याचा धोका 29 टक्के वाढतो. सतत कमी झोप घेत असाल तर हे घातक ठरू शकतं. याने ब्लड प्रेशर वाढतं आणि हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो.
4) क्रोनिक स्ट्रेस कमी करा
सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचं प्रमाण वाढलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि संभावित हृदयरोगाचा धोका वाढतो. जेव्हा एखादी व्यक्ती वृद्ध होते तेव्हा क्रोनिक स्ट्रेसही मेमरीला नकारात्मकपणे प्रभावित करते. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान साधनेची मदत घ्यावी.
5) जास्त वेळ बसू नका आणि व्यायाम करा
जास्त वेळ बसून राहिल्याने डीन वेन थ्रोम्बोसिसचा धोका वाढू शकतो. जी एक ब्लड क्लॉट कंडिशन आहे. दिवसभर काम करत असताना उभं राहणे, स्ट्रेच करणे किंवा फिरण्यासारखे छोटे छोटे ब्रेक घ्या. यासाठी तुम्ही अलार्म सुद्धा सेट करू शकता.
नोकरी करणारे लोक नेहमीच आपल्या कामांमध्ये अडकतात आणि आपल्या आरोग्याची हवी तशी काळजी घेत नाहीत. पण हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की, हृदय निरोगी ठेवणारी जीवनशैली तुम्ही कधी अंगीकारू शकता. वर बदल तुम्ही लाइफस्टाईलमध्ये केले पाहिजे.