Tips To Keep Heart Healthy: आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांच्या चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे लोकांना हृदयरोगांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. हृदय आपल्या शरीरात सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. याच्यावरच आपलं शरीर योग्यप्रकारे चालवण्याची जबाबदारी असते. पण चुकून आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होतात, ज्यामुळे आपल्या हृदयाला नुकसान पोहोचतं. आपण सगळेच आपल्या रोजच्या जीवनात अनेक पदार्थ खातो, जे अनहेल्दी असतात. अशात आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की, आपण आपलं हृदय आणि शरीर कसं हेल्दी ठेवावं.
लो कॅलरी असलेला आहार
हाय कॅलरी आणि सोडिअम असलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. याने लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदरोगासोबत अनेक आजारांचा धोका वाढतो. जर तुम्हाला या आजारांना दूर ठेवायचं असेल तर कॅलरी कमी असलेले पदार्थ खावेत.
प्लेटमध्ये भाज्या आणि फळांना जागा द्या
भाज्या आणि फळं शरीराला व्हिटॅमिन आणि खनिजं देतात. भाज्या आणि फळांमध्ये कॅलरी कमी असतात व फायबर जास्त असतं. भाज्या, फळं आणि प्लांट फूड हृदयरोग रोखण्यास फायदेशीर असतात. त्यामुळे रोजच्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या, फळांचा समावेश नक्की करा.
कडधान्य
कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि इतरही अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. जे ब्लड प्रेशर आणि हृदयरोगांचा धोका कमी करतात. त्यामुळे तुम्ही प्रॉसेस्डच्या जागी डाएटमध्ये कडधान्याचा समावेश करा.
मीठ कमी खा
जर तुम्हाला जास्त मीठ खाण्याची सवय असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं. कारण जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. मिठाचं सेवन कमी प्रमाणात असावं तरच ते फायदेशीर असतं.