शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

Corona Side effects: कोरोनातून बरे झाल्यानंतर वाढु शकते हृदयरोगाची समस्या, वेळीच घ्या काळजी, तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 3:45 PM

आकडेवारीवरून दिसून येतंय की, कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांमध्ये हृदयविकाराची प्रकरणे अधिक दिसून येत (Increase In Heart Rate After Covid) आहेत.

भारतात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासादायक वातावरण आहे. मात्र, कोविडनंतरच्या गुंतागुंती वाढत राहण्याची शक्यता आहे. कोरोनाची लाट आता ओसरली, संसर्ग कमी झाल्यानं आपण कोरोनापासून वाचलोय आणि कायमचं सुरक्षित आहे, असा विचार करणंही चुकीचं आहे. कोविडचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो आणि संसर्गानंतरही (post-COVID complications) त्याचे परिणाम कायम राहतात.

या श्वासोच्छवासाच्या आजारातून बरे झाल्यानंतरही फुफ्फुस, हृदय आणि पोटाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. याचा अर्थ कोरोना विषाणूचा शरीराच्या अनेक भागांवर गंभीर परिणाम झाला आहे. बरे होऊन बराच काळ लोटल्यानंतरही अनेकांना समस्या येत आहेत. आकडेवारीवरून दिसून येतंय की, कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांमध्ये हृदयविकाराची प्रकरणे अधिक दिसून येत (Increase In Heart Rate After Covid) आहेत.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीत, नारायणा हेल्थ सिटी, बंगळुरू येथील सल्लागार इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रवीण पी सदारमीन म्हणतात, 'कोविड-19 हे हृदयासाठी एक मोठं संकट ठरू शकतं. वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) ने महामारीच्या सुरुवातीला भीती व्यक्त केली होती की कोविड -19 मुळे विविध समस्या वाढू शकतात, ज्यामुळे लोकांमध्ये हृदयाची इंफ्लामेटरी आणि इतर अनेक समस्या असू शकतात. मायोकार्डिटिस (Myocarditis) किंवा पेरीकार्डिटिसचाही (Pericarditis) त्रास होऊ शकतो. हेच कारण आहे की, वैद्यकीय तज्ज्ञ कोविडमधून बरे झाल्यानंतर हृदयाची चाचणी घेण्याची शिफारस करतात. ,

कोविड आणि हृदयाच्या ठोक्यांचा दरकोरोना संसर्गातून बरे झालेले अनेक लोक हृदयाचे ठोके वाढल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. सामान्य हृदय गती ६० ते १०० च्या दरम्यान असते. काही कारणांमुळे ही गती अधूनमधून वाढू शकते, जरी संसर्गातून बरे झाल्यानंतर, बहुतेक लोकांमध्ये या प्रकारची समस्या कायम असल्याचे दिसून येते. याला वैद्यकीय भाषेत टाकीकार्डिया असे म्हणतात. कोविडमध्ये, बर्‍याच रुग्णांनी बरे झाल्यानंतरही जलद हृदयाचे ठोके जाणवणे यासारख्या अनेक हृदयाशी संबंधित समस्यांची तक्रार केली असून ही चिंतेची बाब आहे.

टाकीकार्डियाबद्दल जाणून घ्याटाकीकार्डिया (Tachycardia) ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये हृदय गती वाढते; हे एकतर हृदयाच्या खालच्या कक्षेत सुरू होऊ शकते, ज्याला वेंट्रिकल्स म्हणतात किंवा वरच्या कक्षेत ज्याला अट्रिया म्हणतात. ज्यांना कोरोनाचा सौम्य-मध्यम स्तराचा संसर्ग झाला आहे अशा लोकांमध्येही हृदय विकार वाढण्याची समस्या दिसून येत आहे. सामान्यरित्या हृदय गती ९५-१०० पर्यंत वाढते. अनेक रुग्णांमध्ये, ही स्थिती काही काळानंतर बरी होते, जरी काहींमध्ये ती दीर्घकाळ टिकू शकते. जलद हृदयाचे ठोके राहिल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

कोरोनामधून बरे झाल्यानंतर अनेकांना थोडेसे काम किंवा श्रम केल्यावरही हृदयाचे ठोके वाढताना दिसून येतात. ज्यांना कोरोनापूर्वी तासनतास काम करूनही थकवा येत नव्हता, त्यांना काही वेळातच दम लागतो, हृदयाचे ठोके वाढतात. अशा स्थितीत थोडे अंतर चालण्यासारख्या लहानशा शारीरिक हालचाली केल्यावरही हृदयाचे ठोके 95-100 पर्यंत वाढतात. बर्‍याच रुग्णांमध्ये ही स्थिती काही काळानंतर बरी होते, तर अनेकांमध्ये ती काही काळ टिकून राहते. तसेच, हृदयाशी संबंधित आजारांची पूर्वीची नोंद असलेल्या लोकांसाठी हृदयाचे ठोके चढ-उतार होणे धोकादायक आहे.

अभ्यासाचे परिणामद लॅन्सेटमध्ये प्रकाशित २०२१ च्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात हृदयविकाराच्या समस्या निर्माण होण्याचा धोका तीन ते आठ टक्क्यांनी वाढला आहे. हा अभ्यास 87 हजार लोकांवर करण्यात आला, ज्यामध्ये 57 टक्के महिला होत्या. रक्ताच्या गुठळ्या आणि हृदयविकाराचा झटका येण्याच्या जोखमीत पुढील आठवड्यात सातत्याने घट झाल्याचेही आढळून आले परंतु किमान एक महिना ते उच्च राहिले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याHeart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटका