मुंबई : शहर-उपनगरात उन्हाचा पारा चढत चालला आहे. त्यामुळे लहान-मोठ्या सगळ्यांनाच उन्हाचा त्रास होत आहे. थोडी काळजी घेतली, तर हा उन्हाळा काही प्रमाणात तरी सुसह्य होईल, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आहारापासून कपडे, त्वचेची काळजी घेण्यात यावी, याकडे मुंबईकरांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले आहे.त्वचेसंबंधी सर्वात जास्त तक्रारी उन्हाळ्यात निर्माण होतात. चेहऱ्यावर डाग पडणे, त्वचा लालसर होणे, वेदना होणे, अशा प्रकारच्या विविध तक्रारी नेहमीच उन्हाळ्यात जाणवतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते, असे त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. दक्षा सिन्हा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भडक रंगांचे कपडे वापरू नका. त्यामुळे शरीराचे तापमान वाढेल. दुसरी गोष्ट, या ऋतूमध्ये टेरिकॉट किंवा सिल्कचे कपडे वापरू नका. साधारणत: फिकट रंगाचे सुती कपडे (ज्यात पांढºया रंगाचा जास्त वापर असेल) वापरणे अधिक चांगले, असेही डॉ. सिन्हा यांनी सांगितले.सध्या सूर्य सर्वाधिक प्रखरतेने आग ओकत आहे. भारतीय उपखंडातील दुपारचा पारा ४० अंशाच्या वर केव्हाच पोहोचला आहे. यालाच ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हटले जाते. अति जास्त उष्णतेच्या वेळी दुपारी शक्यतो घराच्या बाहेर न पडण्याचा सल्ला डॉ. सद्गुरू जोशी यांनी दिला. या दिवसांत विशेषत: आहारावरही नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यात दररोज कमीतकमी ८ ते १२ ग्लास पाणी घ्यायला हवे. आहारात कलिंगड, द्राक्षे, काकडी, अननस, केळी, लिंबू यांचा समावेश करावा. हे थंड आणि पचायलाही हलके असतात. रोजच्या आहारात दही, ताक, दूध यांचा समावेश असावा. आंबट, तिखट आणि कोरडे अन्नपदार्थ खाऊ नका. त्याऐवजी लस्सी, दूध यांचा समावेश जेवणात करावा, असा सल्ला आहारतज्ज्ञ डॉ.मालविका शेणॉय यांनी दिला. या दिवसांत कॉफी व मद्य यांचेही प्रमाण कमी करावे. एसीमधून एकदम उन्हात जाऊ नका. थोडा वेळ एसी नसलेल्या सावलीच्या ठिकाणी थांबा, म्हणजे शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेऊ शकेल.लक्षात असू द्याअति खाण्यावर नियंत्रण ठेवा, जेवणात विविधता ठेवा, जड अन्नापेक्षा पातळ आहार आणि पाणी अधिक चांगले, जेवणात किंवा सरबत-रसात जास्त मीठ वापरू नका.>उष्माघातापासून वाचण्यासाठी काय कराल?अतिनील किरणांचा सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे कधीही चांगले. मात्र, अतिशय थंड पाणी पिणे टाळा.दुपारी १२ जे ३ या वेळेत फिरू नये.फिकट रंगाचे सैल कपडे वापरा, हाफ बाह्यांचे कपडे टाळा.डोक्यावर नेहमी पांढरा रुमाल अथवा टोपी वापरा, तसेच गॉगल, छत्री आणि बुटांचा वापर करा.उष्णता वाढल्यास तोंडालाही रुमाल बांधा, नाक, कान पांढºया रुमालने झाका.एसीतून लगेच उन्हात किंवा उन्हातून लगेच एसीत जाऊ नका, पंधरा मिनिटे सावलीत काढल्यानंतर, उन्हात किंवा उन्हातून सावलीत १५ मिनिटे उभे राहिल्यानंतर एसी किंवा कुलरच्या हवेत जा.ज्यांना हृदयविकाराचा, तसेच मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी नियमित तपासणी करावी. आहारामध्येही रसदार फळांचा वापर करावा, तसेच मांसाहार कदापिही करू नये.मद्यसेवन, चहा-कॉफी आणि काबोर्नेटेड सॉफ्ट फार ड्रिंक्स घेऊ नका, त्यामुळे शरीर डिहायड्रेट होते.उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.दही, ताकाचा आहारात समावेश करा. बाहेर जाताना बाटलीत पाणी घेऊन जा आणि गरज वाटल्यास पाणी पीत राहा. शक्यतो, उन्हात जाणे टाळा.आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.पंख्याचा वापर करा, थंड पाण्याने आंघोळ करा.पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.जनावरांना सावलीत ठेवा व पुरेसे पाणी द्या.उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उन्हाचा पारा चढतोय, काळजी घ्या!, आहार, कपडे, त्वचेवर लक्ष देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 2:38 AM