Torani Benefits: सध्या देशातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे. दिवसेंदिवस गरमी लोकांची हालत बेकार करत आहे. लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होत आहेत. उष्माघातामुळे लोकांचे जीवही जात आहेत. अशात शरीर थंड ठेवणं फार महत्वाचं आहे. शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही एक खास उपाय करू शकता. हा उपाय तुम्हाला भीषण गरमीपासून वाचवू शकतो. आज याच सुपरफूडबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याचे फायदे काय आणि ते कसं करावं हेही सांगणार आहोत.
तांदळाचं पाणी
तांदळाचं पाणी प्यायल्याने हीट स्ट्रोकपासून बचावाचा सोपा उपाय आहे. हे एक हेल्दी ड्रिंक आहे. उष्णतेच्या लाटेत शरीर थंड ठेवण्याचं काम हे पेय करतं. सोबतच याच्या सेवनाने उन्हामुळे आलेला थकवाही दूर करता येतो. यात भरपूर व्हिटॅमिन बी, इलेक्ट्रोलाइट्स, अमीनो अॅसिड आणि सहजपणे पचन होणारे कार्ब्स भरपूर आहेत. यातील प्रोबायोटिक्स पोट निरोगी ठेवतात आणि गरम वातावरणात इम्यूनिटीही वाढवतात.
पचन तंत्रासाठी फायदेशीर
जसजशी उष्णता वाढते तसतशा पोटासंबंधी समस्या वाढत जातात. अशात हे खास पेय टॉनिकसारखं काम करतं. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. जुलाब किंवा बद्धकोष्ठता अशा समस्यांपासून बचाव होतो. तसेच आतड्यांचा आरोग्यही चांगलं राहतं.
त्वचेसाठीही फायदेशीर
जास्त उष्णतेमुळे त्वचा कोरडी किंवा रखरखीत होते. अशात तांदळाचं पाणी त्वचेला हायड्रेट ठेवतं. तांदळाचं पाणी प्यायल्याने त्वचेचा ओलावा कायम राहतो आणि त्वचेसंबंधी इतर समस्याही दूर होतात.
कसं तयार कराल हे पाणी?
- सगळ्यात आधी शिजवलेले तांदूळ रात्रभर भिजवून ठेवा.
- सकाळी तांदळाचं पाणी गाळून वेगळं करा.
- नंतर या पाण्यात दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- त्यानंतर यात आलं, कढीपत्ता, हिरवी मिरची मीठ आणि जिरं पावडर टाका. शेवटी थोडा लिंबाचा रस टाका.तुमच्या सोयीनुसार तुम्ही यात पाणी टाकून पेय पातळ किंवा घट्ट करू शकता.