शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
4
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
5
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
6
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
7
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
8
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
9
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
10
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
11
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
12
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
13
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
14
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
15
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
16
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
17
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
18
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
19
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
20
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!

Hello Doctor: पुनर्वसन स्त्री आरोग्याचे; कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर 'या' गोष्टी लक्षात आल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 1:42 AM

Women Health News: स्त्रियांबाबतीत या आजाराचे बरे होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक जास्त आहे, असा एक संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तरीही रुग्णालयात कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर पुढील गोष्टी लक्षात आल्या.

डॉ. मधुरा उदय कुलकर्णीकोविड-१९ नावाच्या आजाराने जगभर दहशत पसरवली आहे. विशेषत: स्त्रियांना हा आजार झाल्यावर मन-शरीर, भावना साऱ्याच आरोग्याची, सहनशक्तीची परीक्षाच बघितली जाते आणि मग एकदाचे सारे सोपस्कार पार पडल्यावर पुढे काय, हा मोठाच यक्षप्रश्न उभा राहतो. स्त्रियांबाबतीत या आजाराचे बरे होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक जास्त आहे, असा एक संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तरीही रुग्णालयात कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर पुढील गोष्टी लक्षात आल्या.आजारानंतरचे काही दिवस जाणवणारी लक्षणेअशक्तपणा / थकवा/ कामकरण्याचा उत्साह कमी होणेपोटऱ्यांमध्ये गोळे येणेकंबरदुखी / हात - पाय दुखणेचक्कर येणे, थोडे काम केल्यावर धापएकाग्रतेचा अभाव / विसरायला होणेबोलताना उसका लागणे / कोरडा खोकलापचनशक्ती कमी होणेवजन कमी होणे / क्वचित वाढणेहॉर्माेन्सचे असंतुलनअकारण धडधड, चीडचीड इत्यादीभावनिक असमतोलाची लक्षणे

(या प्रकारची लक्षणे निर्माण होण्याची कारणे) - वैद्यकीयदृष्ट्या महिलांना या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अल्प, मध्यम, गंभीर स्वरूपाची व्याधी निर्माण होते. सर्वसाधारणपणे १०-१२ दिवसांत आजाराची बाधा होऊन त्रास हळूहळू कमी होतो. सर्वसाधारणपणे १८ दिवसांनंतर आजाराचे प्रमाण कमी झाल्यावर पुनर्वसनाचा टप्पा पुढे येतो. शारीरिक त्रासांच्या कारणांना पाहता औषधाचे दुष्परिणाम, विषाणूचे संक्रमण इत्यादीमुळे मांसपेशीतील सूज, दुखणे उद्भवते. विविध पोषकांशांच्या, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे काही लक्षणे निर्माण होतात.आथिक समस्या, एकटेपणा, सामाजिक संपर्काचा अभाव, मनाचा कमकुवतपणा यामुळे अनेक मानसिक लक्षणे उद्भवतात.लोह, कॅल्शियम इत्यादीच्या कमतरतेमुळे, कदाचित रुग्णालयातील क्वारंटाइन सेंटरमधील वातावरणामुळे, आजाराच्या दहशतीमुळे भावनिक अस्थिरता व त्यातून भावनात्मक बदल व त्रास दिसून येतात. आर्थिक असाहाय्यता - नोकरी - धंद्यावर अनुपस्थिती व दुर्लक्ष, वैद्यकीय खर्च यामुळे अर्थिक संकट उभे ठाकण्याची शक्यता तयार होते.पुनर्वसन सर्वांगीण आरोग्याचेवैद्यकीय सल्ला व तपासण्यांचे महत्त्व निर्विवाद आहे; म्हणूनच आजारानंतरही डॉक्टरांना नियमित भेटणे गरजेचे आहे.समुपदेशन व मानसिक आरोग्यासाठी योग्य ती मदत गरजेची असेल तर त्याचाही अवलंब करावा.स्वमदत तंत्र व नियोजनाची क्रमवार यादी- बºयाच स्त्रियांना स्वयंपाक करू की नको, माझ्या कुटुंबीयांना माझ्यामुळे संसर्ग तर होणार नाही ना?मला पुन्हा आजार होऊ शकतो का? अशा अनेक शंकांनी ग्रासलेले असते. त्यांच्यासाठी तर हे पुनर्वसन टप्पे खूप महत्त्वाचे आहेत -स्वीकार - पुन्हा काम करण्याचा आत्मविश्वास पावला-पावलांनी येईल. पुन्हा नव्याने सुरुवात करताना काही दिवस जातील, त्यासाठी मनाची तयारी करावी.गैरसमज योग्य शास्त्रीय ज्ञानाने दूर करावेत. सर्वसाधारपणे संसर्ग झाल्यावर १० दिवसांनंतर आपल्यापासून दुसºयांना त्रास होण्याची शक्यता कमी होते.हात स्वच्छ धुण्याची सवय ठेवा. मास्कचा वापर घरात वावरतानाही करावा. योग्य तेव्हा ग्लोव्हज् वापरा.योगसाधना, प्राणायाम, ध्यानाचा सराव, दीर्घ श्वसन, माफक व्यायाम याचा दैनंदिन जीवनशैलीत समावेश करावा.धूपन-घरामध्ये वेगवेगळ्या औषधींनी धूप करावा. (गुगुळ, अगरू, धूप इ. साहाय्याने.)खाण्या-पिण्याच्या सवयीतील बदल.सामाजिक जीवन हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यानुसार काम सुरू करावे, आर्थिक पुनर्वसन होईलच.प्रत्येक अडचण ही काहीतरी नवीन बदलांची सुसंधी असते. आलेल्या या व्यतयांना, थांबलेल्या क्षणांना मनातील सकारात्मक विचारांच्या परीसस्पर्शाने सोन्याची झळाळी नक्कीच आणता येईल.हे टाळाब्रेड / बेकरीचे पदार्थलोणचे, पापड, तळलेलेमसालेदार पदार्थशिळे, फ्रिझमधले आंबवलेले पदार्थबाजारातून आणलेले कृृत्रिमरंगद्रव्ययुक्त पदार्थ.याचा वापर करा

मूठभर काळ्या मनुका पाण्यात भिजवून चावून खाणे. डाळिंब, खजूर, कोकम, खडीसाखर, साळीच्या लाह्या, लाल भोपळा, भाजलेले साठे, साळीचे तांदूळ, गहू-नाचणीचे सत्त्व, मूग-मटकी उसळी, सालीसकट डाळी, पोहे, राजगिरा, गूळ, शिंगाडे, जरदाळू, सुके अंजीर, ज्येष्ठमध + दूध, बेदाणे, साजूक तूप, भाज्यांचे सूप, तांदळाची पेज, सातू इ. पदार्थ जेवणात असावेत. विशेषत: स्त्रियांबाबतीत मानसिक, भावनिक तणावाचा परिणाम शरीरस्थ हार्मोन्सवर होऊन मासिक पाळीसंबंधी तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा विशेष विचार व्हावा, तसेच घरातील स्त्रीचा कुटुंब, समाज आरोग्यावरही प्रभाव असतो. त्यामुळे स्त्री अरोग्याला महत्त्व देणे व कोरोनाबाधेनंतर पुनर्वसनाचे नियोजन करणे अपरिहार्य आहे.

(लेखिका एम.डी.स्त्रीरोग-प्रसूती तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर