'उरी' या सिनेमातील कलाकार अभिनेता नवतेज हुंदल यांचं नुकतंच निधन झालं. नवतेज हुंदल हेपेटायटिस बी या आजाराने ग्रस्त होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. हेपेटायटिस बी हा आजार एचआयव्हीपेक्षाही घातक ठरु शकतो असं सांगितलं जातं. रिपोर्ट्सनुसार, जगातला प्रत्येक १२वा व्यक्ती या आजाराची शिकार असतो. हा आजार सर्वात वेगाने पसरणाऱ्या आजारांपैकी एक आहे.
webmd.com ने दिलेल्या माहितीनुसार, हेपेटायटिस बॅक्टेरियाने पसरणारं इन्फेक्शन असं इन्फेक्शन आहे जे थेट लिव्हरला प्रभावित करतं. सामान्यपणे हे पाच प्रकारचं असतं. यांना ए, बी, सी, डी आणि ई म्हटलं जातं. सध्या जगभरात सर्वात जास्त लोक हेपेटायटिस-बी आणि हेपेटायटिस-सी चे शिकार आहेत.
HIV पेक्षाही घातक Hepatitis B
हेपेटायटिस बी एचआयव्हीच्या तुलनेत ५० ते १०० टक्के अधिक घातक असतो. कारण हेपेटायटिस-बी चा बॅक्टेरिया शरीराच्या बाहेरही कमीत कमी सात दिवसांपर्यंत जिवंत राहून निरोगी व्यक्तीला प्रभावित करु शकतो. पण वेळेवर जर या आजाराच्या लक्षणांची ओळख पटवली तर, जीव वाचू शकतो. हेपेटायटिसचे जेवढे घातक व्हायरस आहे त्यातील व्हायरस बी सर्वात घातक मानला जातो.
कसा पसरतो हेपेटायटिस व्हायरस
हा व्हायरस एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये एकतर संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. हा व्हायरस असा आहे की, याला शरीरातून पूर्णपणे नष्ट केलं जाऊ शकत नाही. पण औषधांच्या माध्यमातून याला नियंत्रित नक्कीच ठेवता येतं. हेपेटायटिस बी फार शांतपणे अटॅक करतो आणि व्यक्तीला याची माहितीही मिळत नाही. हेच कारण आहे की, नकळतपणे हा व्हायरस एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचतो.
हेपेटायटिस बी ची लक्षणे
१) सांधेदुखी, पोटदुखी, उलटी आणि कमजोरी वाटणे.
२) नेहमी थकवा जाणवणे. त्वचेचा रंग पिवळा होतो आणि डोळ्यांचा पांढरा भागही पिवळा होतो.
३) ताप येतो आणि लघवीचा रंगही गर्द होतो.
४) भूक कमी लागते.
हेपेटायटिस बी पासून बचाव
१) सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत शारीरिक संबंध नका ठेवू.
२) दुसऱ्या कुणाशीही सुई, रेजर, टूथब्रश इत्यादी गोष्टी शेअर करु नका.
३) हेपेटायटिस बी आणि सी दुषित पदार्थ, पाणी किंवा इन्फेक्टेड रुग्णाला गळाभेट, चुंबन किंवा सोबत जेवल्याने होत नाही.