मुंबई
कोरोना व्हायरसच्या संकटाशी आपण सामना करत असतानाच आता 'बर्ड फ्लू'च्या उद्रेकानं सगळ्यांची चिंता वाढवली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या 'बर्ड फ्लू'चा शिरकाव झाला आहे. 'बर्ड फ्लू'मुळे बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यू संख्येनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत तर प्रशासन देखील सतर्क झालं आहे.
'बर्ड फ्लू'चे पक्ष्यांमधून मानवामध्ये संक्रमण होण्याचाही धोका वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या 'बर्ड फ्लू'ला आपल्यापासून दूर कसं ठेवायचं? यासाठी पुढील गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात.
१. अर्धवट उकडलेली अंडी
२. अर्धवट शिजवलेलं चिकन
३. पक्ष्यांशी थेट संपर्क टाळा
४. कच्चे मांस उघड्यावर ठेवणं टाळा
५. कच्च्या मांसाशी थेट संपर्क टाळा
यासोबतच आपण मृत पक्ष्यांना उघड्या हातांनी स्पर्श करणं टाळायला हवं. वारंवार हात धुत राहणं आणि स्वत:च्या स्वच्छतेची जास्तीत जास्त काळजी घेणं महत्वाचं आहे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं. मास्क आणि हँडग्लोजचा वापर करावा. पूर्णपणे शिजवलेलं अन्न खाणं ही काळजी आपण सहजपणे घेऊ शकतो.
बर्ड फ्लूची लक्षणं...>> खोकला
>> ताप
>> घशात खवखवणे
>> स्नानूंमध्ये ताण
>> डोकेदुखी
>> श्वसनास त्रास होणे