इंटरनेट हे मनोरंजन आणि माहिती मिळवण्याचं चांगलं माध्यम आहे. पण यामुळे अनेकजण पॉर्नकडे अधिक आकर्षित होतात. पॉर्न बघणे वाईट किंवा चुकीचे नाही. मात्र काही लोकांना पॉर्न बघण्याची सवय लागते आणि हे तुमच्या वैवाहिक जीवनासाठी घातक ठरु शकतं. काही लोकांना याची इतकी सवय लागलेली असते की, ते यातून बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करतात, पण त्यांना यश येत नाही. चला जाणून घेऊ या सवयीतून बाहेर येण्याच्या काही टिप्स...
मनाशी गाठ बांधा
कोणतीही सवय मोडण्यासाठी सर्वातआधी मनाची तयारी करणे फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला पॉर्न बघण्याची सवय का सोडायची आहे. यामागचं कारण शोधा. त्यानेच तुम्हाला प्रोत्साहन मिळू शकतं. यातून तुम्ही तुमच्या सोशल आणि पर्सनल लाईफच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल विचार करा. यामुळे तुम्ही अॅंटी सोशल होत आहात का? याचा विचार करा. म्हणजे जो रिकामा वेळ तुमच्याकडे असतो, त्यावेळात मित्रांशी किंवा परिवारातील सदस्यांशी बोलण्याऐवजी तुम्ही पॉर्न बघता? जीवनाचा फोकस याने हरवतोय का? हे प्रश्न स्वत:ला विचारा. याने तुम्हाला प्रोत्साहन मिळू शकतं. जेव्हाही तुमची पॉर्न बघण्याची इच्छा होईल तेव्हा या गोष्टींची आठवण करा.
इंटरनेटचा योग्य वापर करा
जर तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला कंटाळा आला असेल ऑनलाईन गेम्स खेळू शकता, सिनेमे बघू शकता किंवा मित्रांशी व्हिडीओ चॅट करु शकता. एक्सरसाईज किंवा बाहेर फिरायला जाऊ शकता. याने तुम्ही पॉर्न बघणे टाळू शकता.
अॅडल्ट कन्टेन्ट दूर करा
जास्तीत जास्त पॉर्न बघण्याची सवय लागलेले व्यक्ती त्यांच्याकडे असे मॅगझिन आणि व्हिडीओंचं कलेक्शन ठेवतात. जर तुम्हाला खरंच तुमची सवय तोडायची असेल तर मॅगझिन फेकून द्या आणि व्हिडीओ डिलीट करा.
स्वत:ला द्या आव्हान
सकारात्मक विचार आणि स्वत:च्या मनावरील कंट्रोल यांच्या मदतीने पॉर्न बघण्याची सवय सोडवली जाऊ शकते. तुम्ही एकदा स्वत:ला आव्हान द्या आणि ट्राय करा. तुम्हाला एकदा जरी यश मिळालं तरी तुम्हाला चांगलं वाटेल.
पॉर्न बघण्याचे नुकसान
- पॉर्न बघितल्यावर गिल्ट फील होणे किंवा सतत पॉर्न पाहिल्याने तुमच्या वैवाहिक जीवनावर गंभीर प्रभाव पडू शकतो.
- पॉर्न बघितल्याने तुमच्या पार्टनरसोबतच्या रिअर रिलेशनशिपमधून रस कमी होईल. कारण तुम्हाला पॉर्नमधून क्षणिक सुख मिळवण्याची सवय लागलेली असते.
- जर तुमचा पती किंवा पत्नी पॉर्न बघत असतील तर तुमच्या मनात असन्मानाची भावना येऊ शकते. काही लोकांना अशा परिस्थितीमध्ये असुरक्षीत वाटू शकतं. याने वैवाहिक जीवन संकटात येऊ शकतं.