कोलेस्ट्रॉल शरीरात तयार होणारा एक चिकट पदार्थ आहे. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचा असतो एक गुड कोलेस्ट्रॉल आणि एक बॅड कोलेस्ट्रॉल. बॅड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी फार घातक मानला जातो. नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झालं तर याने नसा ब्लॉक होतात, रक्तप्रवाह थांबतो. याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका खूप जास्त वाढतो.
शरीरात तयार होणारं कोलेस्ट्रॉल शरीरासाठी फायदेशीरही असतं. पण याचं प्रमाण वाढलं तर वेगवेगळे आजार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. शुगर आणि सॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर केवळ हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकच नाही तर यामुळे डोळ्यांवरही फार वाईट प्रभाव पडतो. कोलेस्ट्रॉल वाढलं तर डोळ्यांच्या आजूबाजूलाही काही बदल बघायला मिळतात. यामुळे डोळ्यांचा रंग, बघण्याची क्षमता यावर परिणाम होतो. जर तुम्हाला डोळे चांगले ठेवायचे असतील तर तुम्ही काही गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे.
कोलेस्ट्रॉल डोळ्यांना कसं करतं प्रभावित?
जॅंथिलास्मा - जॅंथिलास्मा हाय कोलेस्ट्रॉलचं सगळ्यात कॉमन लक्षण मानलं जातं. यात डोळा आणि आजूबाजूची त्वचा पिवळी पडू लागते. याने तुमच्या दृष्टीवर काही परिणाम होत नाही. या समस्येचा सामना अशा लोकांना जास्त करावा लागतो जे स्मोकिंग करतात किंवा ज्यांना डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणाची समस्या आहे. यात डोळ्यांच्या पापण्यांवर आणि खालच्या भागावर कोलेस्ट्रॉल दिसतं. डोळ्याच्या आजूबाजूला कोलेस्ट्रॉलच्या पुरळ दिसतात.
आर्कस सेनिलिस - आर्कस सेनिलिस किंवा कॉर्नियल आर्कस एक अशी स्थिती आहे ज्यात डोळ्यात कॉर्नियाच्या चारही बाजूने निळा किंवा भुरक्या रंगाचा एक रंगीत थर तयार होतो. हे कॉर्नियामध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्याचं कारण असतं. ही समस्या मुख्यत्वे मध्यम वयाच्या लोकांमध्ये होते. डोळ्याच्या आजूबाजूला जमा कोलेस्ट्रॉल सर्जरी करून काढलं जाऊ शकतं.
रेटिनल वेन ऑक्लुजन - रेटिनल वेन ऑक्लूजन एक असा आजार आहे ज्याचा थेट संबंध कोलेस्ट्रॉलसोबत असतो. ही समस्या ग्लूकोमा, डायबिटीस, वस्कुलर डिजीज, हाय ब्लड प्रेशर आणि ब्लड डिसऑर्डरसोबत होते. या आजारामुळे रेटिनापर्यंत रक्त घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.