Fruits To Reduce Cholesterol: हिवाळ्यात वातावरण, लाइफस्टाईल आणि आहारात बदल होत असल्याने कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढतं. या दिवसांमध्ये तेल आणि तूपापासून तयार पदार्थ अधिक खाल्ले जातात. अशात फॅटी पदार्थ खाल्ल्याने रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. यामुळे रक्तप्रवाह प्रभावित होतो. यामुळे हृदयापर्यंत रक्त व्यवस्थित पोहोचू शकत नाही. सोबतच हृदयासंबंधी अनेक समस्याही होऊ शकतात. अशात डाएटमध्ये काही बदल करून हाय कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं. काही फळांचा डाएटमध्ये समावेश केला तर कोलेस्ट्रॉल कंट्रोल केलं जाऊ शकतं.
सफरचंद
सफरचंदमध्ये पॉलिफेनोल्स, अॅटी ऑक्सिडेंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करता येतं. याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. सफरचंद खाल्ल्याने शरीरातील फॅट बरंच कमी होतं. याने हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास बरीच मदत मिळते.
पपई
पपई हृदयासाठी फार फायदेशीर असते. यात फायबर, अॅटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व भरपूर असतात. अशात पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं.
संत्री आणि लिंबू
संत्री आणि लिंबूसारखे फळ कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. या व्हिटॅमिन सी आणि अॅटी ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतं. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. हृदयासंबंधी अनेक समस्याही यामुळे कमी होतात.
पेर
पेर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फार फायदेशीर मानलं जातं. प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अॅटी ऑक्सीडेंट्स भरपूर असल्याने याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. तसेच यात पेक्टिन नावाचं फायबर असतं, जे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वेगाने कमी करतं.
द्राक्ष
अनेक पोषक तत्व असलेल्या द्राक्षाने आरोग्याला अनेक फायदे होतात. डॉक्टर नेहमीच यांचं सेवन करण्याचा सल्ला देतात. तसेच याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासही मदत मिळते. यातील फायबर आणि अॅटी ऑक्सिडेंट बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात.