High Cholesterol signs : कोलेस्ट्रॉल आपल्या कोशिकांमधील एक मेणासारखा चिकट पदार्थ आहे. कोशिकांचं निर्माण करण्यासाठी कोलेस्ट्रॉस गरजेचं असतं. कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरातील कोशिका आणि अवयव योग्य प्रकारे काम करतात. त्यासोबतच कोलेस्ट्रॉल हार्मोन, व्हिटॅमिन आणि पचनासाठी आवश्यक फ्लूइडची निर्मिती करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. पण जर शरीरात हाय कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यावर आर्टरीजमध्ये फॅट जमा होऊ लागते. हळूहळू फॅट वाढल्याने आर्टरीजमध्ये ब्लड फ्लो कमी होतो. ज्यामुळे हार्ट डिजीज आणि स्ट्रोससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर फार ठोस असे संकेत दिसत नाहीत. ज्यामुळे याला एक सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. अशात गरजेचं आहे की, जर तुम्हाला तुमच्या शरीरात काहीही वेगळं जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. केसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत दिसू शकते.
जॉन हॉपकिंसच्या वैज्ञानिकांनी उंदरांवर एक रिसर्च केला ज्यातून आढळून आलं की, हाय कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाल्ल्याने याचा केसांवर फार वाईट परिणाम होतो. नेचर जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित या रिसर्चमधून इशारा देण्यात आला की, कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्याने केस खूप गळतात आणि पांढरेही होतात.
त्याशिवाय वैज्ञानिकांनी उंदरांच्या एका ग्रुपवर एथेरोस्क्लेरोसिस कंडीशनची टेस्ट केली. ही एक अशी स्थिती आहे ज्यात धमण्यांच्या आत फॅट जमा होतं. ज्यामुळे ब्लड फ्लोमध्ये समस्या निर्माण होते. यासाठी उंदरांना दोन गटात विभागण्यात आलं. या रिसर्च दरम्यान उंदरांच्या एका ग्रुपला नॉर्मल डाएट देण्यात आली. तर दुसऱ्या ग्रुपला हाय फॅट आणि हाय कोलेस्ट्रॉलची डाएट दिली गेली.
या रिसर्च दरम्यान वैज्ञानिकांच्या टीमला आढळून आलं की, उंदरांच्या ज्या ग्रुपला हाय फॅट आणि हाय कोलेस्ट्रॉलची डाएट दिली होती. त्यांना हेअर लॉसच्या समस्येचा सामना करावा लागला होता. रिसर्च पूर्ण झाल्यावर वैज्ञानिकांनी शेवटी असा निष्कर्ष काढला की, हाय कोलेस्ट्रॉल डाएटचा केसांवर फार वाईट परिणाम होतो. वैज्ञानिकांना आढळलं की, हाय कोलेस्ट्रॉलमुळे केस पांढरे होतात आणि फार जास्त गळतात.
कशामुळे वाढतं कोलेस्ट्रॉल?
दारूचं जास्त सेवन
स्मोकिंग
एक्सरसाइज न करणं
पुरेशी झोप न घेणं
जास्त स्ट्रेस
सॅच्युरेटेड फॅटयुक्त डाएट
हाय ट्रान्स फॅटयुक्त डाएट