Moong Dal For High Cholesterol : वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरीज डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीजचा धोका निर्माण होतो. अशात शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढूच न देणे हा बेस्ट उपाय आहे. जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक डाळ फार महत्वाची ठरू शकते.
आरोग्यासाठी फायदेशीर आहे मूगडाळ
आरोग्याच्या दृष्टीने आपल्या रोजच्या आहारात डाळींना फार महत्व आहे. सामान्यपणे डाळींचा वापर आपल्याला प्रोटीन मिळवण्यासाठी केला जातो. मात्र, डाळी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही फायदेशीर असतात. आज आम्ही तुम्हाला मूगडाळीच्या फायद्यांबाबत सांगणार आहोत. मूगाची डाळ दोन प्रकारे खाल्ली जाऊ शकते. एक म्हणजे सालीसहीत आणि दुसरं म्हणजे साल काढून.
कसं करावं सेवन?
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर भिजवलेले मूग खा. यासाठी हिरवे मूग पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून खाऊन घ्या. तुम्हाला टेस्ट हवी असेल तर मोड आलेल्या मुगात तुम्ही मीठ, कांदा टाकूनही खाऊ शकता.
कोलेस्ट्रॉल होणार कमी
मूगडाळीत हायपोकोलेस्ट्रोलेमिया कमी करणारे गुण असतात. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट हिरवे मूग भिजवून खाण्याचा सल्ला देतात. काही आठवडे याचं नियमित सेवन केलं तर रक्तातून बॅड कोलेस्ट्रॉल कमी होईल.
कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर
अर्थातच जेव्हा मूग डाळीने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होईल तेव्हा नसांमध्ये ब्लॉकेजही कमी होईल. ज्यामुळे ब्लड फ्लो योग्यप्रकारे सुरू राहील. तसेच हाय ब्लड प्रेशरची समस्याही तुमच्यापासून दूर राहील.