High Cholesterol Symptoms in Legs: सामान्य कोलेस्ट्रॉल वाढलं हे वाढतं वजन आणि पोटावरील चरबीमुळे समजतं. पण हे इतरही काही पद्धतीने माहिती करून घेता येऊ शकतं. कोलेस्ट्रॉल हे एकप्रकारचं फॅट आहे जे तयार करण्यात लिव्हर महत्वाचं योगदान असतं. शरीरात तयार होणारं बॅड कोलेस्ट्रॉल डायबिटीस आणि हार्ट अटॅकसारख्या समस्या निर्माण करतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं पायांवरही दिसतात. ज्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
पाय थंड पडणे
हिवाळ्यात पाय थंड होणे ही एक सामान्य बाब आहे. पण जर भीषण गरमीतही असं होत असेल तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे. हा शरीरात हाय कोलेस्ट्रॉलचा संकेत असू शकतो. अशात वेळीच डॉक्टरांकडून चेकअप करावं.
पायाच्या त्वचेचा रंग बदलणे
हाय कोलेस्ट्रॉलमुळे पायांकडे होणाऱ्या रक्तप्रवाहावरही प्रभाव पडतो. ज्याचा प्रभाव पायांवर स्पष्टपणे दिसून येतो. रक्ताच्या कमतरतेमुळे पायांची त्वचा आणि नखांचा रंग बदलू लागतो. कारण रक्ताद्वारे पोहोचणारं ऑक्सीजन आणि न्यूट्रिएंट्सच्या सप्लायमध्ये अडथळा निर्माण होतो.
पाय अखडणे
अनेक लोकांना रात्रीच्या वेळी पाय अखडतात जे हाय कोलेस्ट्रॉलच कॉमन लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या शरीराताच्या खालच्या भागातील नसांमध्ये कोलेस्ट्रॉल पोहोचलं आहे. पायांसोबतच बोटं, टाचा आणि पायाची बोटंही अखडतात. ज्याचा प्रभाव झोपेवर पडतो.
पाय दुखणे
जेव्हा हाय कोलेस्ट्रॉलमुळे पायांच्या रक्ताप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि तिथपर्यंत ऑक्सीजन योग्यप्रकारे पोहोचत नाही. अशात पाया दुखू लागतात. पाय जड वाटू लागतात आणि थकवा जाणवतो. अशा स्थितीत चालणंही अवघड होतं.