महिलांनाच नाही तर पुरूषांना सुद्धा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असतात. अनेकदा दुर्लक्ष केल्यामुळे लहान समस्यांचं रुपांतर मोठ्या आजारात होतं. भारतात मोठ्या प्रमाणावर ब्रेस्ट कॅन्सरच्या आजाराने महिलांचा मृत्यू होतो. काही केसेसमध्ये खबरदारीचे उपाय घेतले असता हा आजार पूर्णपणे बरा सुद्धा होतो. आज आम्ही तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचण्यासाठी आहार कशापध्दतीने घेतला जावा. यासाठी असलेल्या रिसर्चबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा रिसर्च.
तरूण वयात जास्त फायबर्स असले्ल्या पदार्थांचा आहारात समावेश केला तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो. तसंच या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की ज्या महिला जास्त फायबर असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करतात तसंच फळं, भाज्यांचे सेवन जास्त करतात, अशा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो तुलनेने ज्या महिला फायबर्सचा आहार घेत नाहीत किंवा कमी प्रमाणात घेतात यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. हा रिसर्च जर्लन पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ( हे पण वाचा-तासंतास टीव्ही, लॅपटॉपसमोर बसत असाल तर 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी, नाही तर टीव्ही बघणं पडेल महागात....)
हा रिसर्च २७ ते ४४ या वयोगटातील महिलांवर करण्यात आला होता. एकूण ९० हजारांपेक्षा जास्त महिला या रिसर्चमध्ये समाविष्ट होत्या. फायबर्समुळे पचनक्रिया चांगली राहते. त्यामुळे कॉलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासाठी मदत होते.आहारात डाएटरी फायबर्सचा समावेश केल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. त्यासाठी जास्त फायबर्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. हाय फायबर्समध्ये आळशीच्या बीया, एवोकॅडो, भाकरी, डाळी, फळं यांचा समावेश होतो. ( हे पण वाचा-घाम आणि खाजेमुळे तुम्हीसुद्धा व्हाल STD चे शिकार, जाणून घ्या ट्रायक्रेमोनिएसिसची गंभीर लक्षणं)