(Image Credit : stemjar.com)
अलिकडे लोकांच्या शरीरात चरबी वाढण्याचं प्रमाण अधिक बघायला मिळतं. याची वेगवेगळी कारणेही असतात. बदलती लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, एकाजागी बसून काम करणे आणि एक्सरसाइज न करणे अशी वेगवेगळी प्रमुख कारणे सांगितली जातात. शरीरात चरबी वाढण्याच्या या प्रमुख कारणांमध्ये आणखी एक कारण समोर आलं आहे. एका रिसर्चनुसार, आहारातून फ्रक्टोजचं(फळांपासून तयार केलेली साखर) जास्त प्रमाण घेतलं तर तुमचं लिव्हर डॅमेज होऊ शकतं.
(Image Credit : msn.com)
या रिसर्चनुसार, फ्रक्टोज-रिच डाएटने लिव्हरची फॅट बर्न करण्याची क्षमता डॅमेज होते. Cell Metabolism या जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, आहारात ग्लूकोजचं प्रमाण जास्त असेल तर लिव्हरची फॅट बर्न करण्याची सिस्टीम इम्प्रूव्ह होते. तर फ्रक्टोज रिच फूडचा हेल्थवर नकारात्मक प्रभाव पडतो. मग भलेही दोन्ही कॅलरींच प्रमाण समान असो.
हॉर्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक आणि रिसर्चचे मुख्य लेखक सी. रोनाल्ड म्हणाले की, या रिसर्टमधून सर्वात महत्वाची बाब ही समोर आली की, फ्रक्टोज रिच डाएटने नुकसान होतं.
(Image Credit : todayifoundout.com)
ते म्हणाले की, वाईट प्रभाव याच्या हाय कॅलरीमुळे नाही तर याच्या लिव्हर मेटाबॉलिज्मला प्रभावित करण्याने पडतो. फ्रक्टोज रिच डाएट घेतल्याने तुमचं लिव्हर जास्त फॅट स्टोर करतं. वैज्ञानिकांनी अशीही माहिती मिळवली की, फ्रक्टोज रिच डाएटसोबत पदार्थांमध्ये फॅटचं प्रमाणही अधिक असेल तर लिव्हरच्या फंक्शनमध्ये हडबड होण्याची शक्यता अधिक राहते.
काय आहे फ्रक्टोज?
(Image Credit : medicalnewstoday.com)
फ्रक्टोज ही एक सिंपल शुगर आहे. जी फळांपासून, भाज्यांपासून आणि काही नैसर्गिक गोड पदार्थांपासून तयार केली जाते. ही बाजारात स्वीटनरच्या रूपात मिळते.
फ्रक्टोजचं अधिक प्रमाण कशात असतं?
बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये फ्रक्टोजचं प्रमाण अधिक असतं. त्यात प्रामुख्याने सोडा, फ्रोजन जंक फूड्स, ब्रेड्स, कॅन्ड फ्रूट्स, ज्यूस, चिप्स, कुकीज, एनर्जी ड्रिंक, जॅम आणि जेली, आइस्क्रीम इत्यांदीमध्ये फ्रक्टोज अधिक प्रमाणात असतं.