गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टी पिण्याची चांगलीच क्रेझ वाढलेली बघायला मिळते. वजन कमी करणाऱ्यांमध्ये तर ग्रीन टी फारच लोकप्रिय झाली आहे. कारण ग्रीन टी मधील अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व वजन कमी करण्यास मदत करतं. ग्रीन टी एक फायदेशीर हर्बल पेय मानलं जातं. पण ग्रीन टी चं नियंत्रित असेल तरच याचा फायदा होतो. ग्रीन टी पिण्याचं प्रमाण वाढलं तर आरोग्याला हानी पोहोचू शकते.
एका दिवसात दोन कपपेक्षा जास्त ग्रीन टी प्यायल्यास नुकसान होऊ शकतं. इतर दुसऱ्या पदार्थांप्रमाणे ग्रीन टीमध्येही कॅफीन असतं जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. जास्त प्रमाणात ग्रीन टी घेतल्यास डोकेदुखी, पोटदुखी, अॅसिडिटी, डायरिया आणि अस्वस्थता या समस्या होऊ लागतात. गर्भवती महिलांना ग्रीन टी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.
1) ग्रीन टीमध्ये टॅनिन्स नामक तत्व आढळतं. याने पोटदुखी, अॅसिडिटी आणि लूज मोशनची समस्या होऊ शकते. रिकाम्या पोटी ग्रीन टी घेणे आरोग्यास नुकसान करणारं ठरु शकतं.
2) जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्यास एनिमियाची शक्यता वाढते.
3) जर तुम्ही अधिक प्रमाणात ग्रीन टी सेवन करत असाल तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ग्रीन टीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे दिवसातून कमीत कमी दोन कप ग्रीन टी सेवन करावी.
4) जास्त प्रमाणात ग्रीन टी सेवन केल्यास झोप न येण्याची समस्या होऊ शकते. ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे झोप प्रभावित होते. त्यामुळे आणखीही काही आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
5) जास्त प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करणे हृदयासाठीही चांगलं नाहीये. याने हृदयाशी निगडीत समस्या वाढण्याची शक्यता असते.
6) ग्रीन टी चे अधिक प्रमाणात सेवन केल्यास डायरिया होण्याचीही शक्यता असते.