How to Control Uric Acid: जर तुमच्या हात पायांवर सूज असेल किंवा हाडांमध्ये सतत वेदना होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे शरीरात जास्त यूरिक अॅसि़ड तयार झाल्याचं लक्षण असतं. जर वेळीच यावर उपचार केले गेले नाही तर समस्या वाढू शकते. पुढे जाऊन ही समस्या गंभीर आजाराचं रूप घेऊ शकते. अशात शरीरात यूरिक अॅसिड वाढण्याची कारणं आणि त्यावर उपाय तुम्हाला माहीत असले पाहिजे.
शरीरात कसं तयार होतं यूरिक अॅसिड?
यूरिक काय असतं हे आधी समजून घ्या. मुळात हे एक केमिकल असतं. जे आपल्या शरीरात नैसर्गिक रूपाने तयार होतं आणि मग लघवीच्या माध्यमातून शरीरातून बाहेर पडतं. हे शरीरात तयार होणं किंवा शरीरातून बाहेर जाणं ही काही समस्या नाही. पण समस्या तेव्हा होते तेव्हा हे आपल्या शरीरात गोठून जमा होऊ लागतं. यामुळे हाडांमध्ये वेदना आणि पायावर सूज येऊ लागते. ज्यामुळे चालणंही अवघड होतं.
यूरिक अॅसिड वाढण्याची कारणं..
डॉक्टरांनुसार, शरीरात यूरिक अॅसिड वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. यात मांसाहार जास्त करणे, पुरेशी झोप न घेणे, मद्यसेवन जास्त करणे आणि चुकीचं खाणं-पिणं यांचा समावेश आहे. या सगळ्यांमध्ये प्यूरिक नावाचं एक तत्व जास्त प्रमाणात असतं. जे शरीरातील यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढवतं. त्याशिवाय नियासिन आणि अॅस्प्रिन सारख्या औषधांमुळेही याचं प्रमाण वाढू शकतं.
यूरिक अॅसिड कंट्रोल करण्याचे उपाय
शरीरात वाढलेलं यूरिक अॅसिडचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. यासाठी तुम्ही आपल्या आहारातून आले आणि ओव्याचं सेवन करा. आल्यामध्ये मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंटसारखे गुण असतात. तेच ओव्यामध्ये अॅंटी इफ्लामेटरी गुण असतात. हे सगळे गुण यूरिक नसिडला कंट्रोल करतात. ज्यामुळे सांधेदुखी, सूज हळूहळू कमी होते.