कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. लस घेतल्यानंतर सावधगिरी बाळगायला हवी, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान सोशल मीडियावर कोरोनाबाबत एक सकारात्मक घटना व्हायरल होत आहे. १०४ वर्षीय आजींचे नाव कॅरमन हेरनानडींज आहे. या आजी कोलंबियाच्या रहिवासी असून त्यांनी जवळपास २ वेळी कोरोनाला हरवलं आहे. एकदा कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर आजी पूर्णपणे बऱ्या झाल्या. त्यानंतर पुन्हा त्यांना व्हायरसचं संक्रमण झालं होतं.
ABCNews नं व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या महिलेला बेडवर झोपवण्यात आलं आहे. त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयातून निरोप देताना सगळ्यांनी ताळ्या वाजवल्या आहेत. जवळपास २१ दिवस या आजी रुग्णालयात राहिल्या होत्या. हा व्हिडीओ इतर कोरोना रुग्णांसाठी प्रेरणादायक आणि हिंमत देणारा ठरला आहे.
नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार
मागच्या वर्षी जूनमध्ये या आजींना कोरोनाचं संक्रमण झालं होतं. रुग्णालयातील स्टाफ त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहे आणि त्यांची हिंमत वाढवत आहे. त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, ''सुरूवातीला त्यांची घरात ट्रीटमेंट सुरू होती. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यशस्वी उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. ''
सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले..
लोकांनी ट्विटरवरसुद्धा या आजींना हिंमत देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना हा जीवघेणा आजार असला तरी गाईडलाईन्सचं पालन आणि वैयक्तीक स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास या आजारापासून वाचता येऊ शकतं.