शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

त्रिपुरातील शेकडो विद्यार्थ्यांना HIV ची लागण; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 2:07 PM

भारताच्या पूर्वेकडील त्रिपुरा राज्यातील 828 विद्यार्थ्यांना एचआयव्हीची लागण, तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे.

HIV vs AIDS : भारताच्या पूर्वेकडील त्रिपुरा राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये HIV/AIDS चा फैलाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्रिपुरा राज्य एड्स नियंत्र सोयायटीच्या(TSACS) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 828 विद्यार्थ्यांना एचआयव्हीची लागण झाली आहे, तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एचआयव्ही बाधित अनेक विद्यार्थी देशभरातील विविध विद्यापीठे किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. 

एड्स (AIDS) हा एचआयव्ही (HIV) विषाणूमुळे होणारा आजार आहे. हे दोन्ही रोग एकच आहेत, असा बहुतांश लोकांचा समज आहे. पण, एड्स आणि एचआयव्हीमध्ये खूप फरक आहे. जाणून घेऊ या दोन्ही रोगांमधील अंतर...

HIV आणि AIDS मधील फरक एचआयव्हीला ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणतात, जो शरीराच्या WBC (पांढऱ्या रक्त पेशी) वर हल्ला करतो. यामुळे रोगप्रतिकार शक्ती इतकी कमकुवत होते की, शरीराला किरकोळ दुखापती किंवा आजारातूनही ठीक करता येत नाही. तर एड्स ही एक वैद्यकीय स्थिती आहे, जी एचआयव्हीमुळे होते. प्रत्येक एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला एड्स होतोच असे नाही, परंतु एड्स फक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांनाच होतो.

एचआयव्ही पॉझिटिव्हला एड्स कधी होतो?एड्स हा एचआयव्हीचा पुढचा टप्पा आहे. एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाली की, बरे होणे यापुढे शक्य नसते. परंतु, औषधांच्या मदतीने धोकादायक टप्प्यापर्यंत पोहोचणे टाळता येते. एचआयव्हीवर वेळेवर उपचार न केल्यास तो गंभीर स्टेज 3 पर्यंत पोहोचतो आणि मग एड्स होतो. असे बरेच लोक आहेत, जे एचआयव्ही पॉझिटिव्ह असूनही, त्यांना एड्स नाही.

एचआयव्ही संसर्गाची लक्षणे1. दोन ते चार आठवड्यांत लक्षणे दिसू लागतात.2. ताप, डोकेदुखी, पुरळ किंवा घसा खवखवणे यासारख्या सुरुवातीच्या समस्या3. वजन कमी होणे, अतिसार, खोकला, लिम्फ नोड्स सुजणे

एड्स किती धोकादायक आहे?डब्ल्यूएचओच्या मते, एड्स हा आजार नाही, परंतु जेव्हा तो होतो, तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती इतकी कमकुवत होते की, शरीर सहजपणे रोगांना बळी पडते आणि त्यातून बरे होणे अशक्य होते. एड्स हा एचआयव्ही विषाणूमुळे होतो, जो असुरक्षित लैंगिक संबंधातून, संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे किंवा गर्भधारणेदरम्यान किंवा संक्रमित मातेकडून प्रसूतीदरम्यान तिच्या बाळामध्ये पसरू शकतो.

एचआयव्हीवरील उपचार आणि प्रतिबंधएचआयव्ही विषाणूवर अद्याप कोणताही इलाज नाही, पण अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत ते टाळण्यासाठी इंजेक्शनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. यावर अजूनही काम सुरू आहे. काही औषधांच्या मदतीने एचआयव्हीवर नियंत्रण ठेवता येते आणि धोकादायक अवस्थेत जाण्यापासून रोखता येते. एचआयव्हीवरील औषधांना अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) म्हणतात. एचआयव्ही टाळण्यासाठी शारीरिक संबंध ठेवताना काळजी घेणे आवश्यक आहे. रोगाची लक्षणे तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.

टॅग्स :HIV-AIDSएड्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सTripuraत्रिपुरा